लंडन, 27 जानेवारी : आपला मोबाईल चुकून पडला, तर त्याचं नुकसान होऊ नये म्हणून आपण मोबाईल कव्हर लावतो. यामुळे आपला मोबाईल सेफ असतो. मोबाईलला सुरक्षा देणारा हेच मोबाईल कव्हर भविष्यात तुमचंही सुरक्षा कवच होणार आहे. तुम्हाला आजारी पाडणाऱ्या अनेक बॅक्टेरियांचा तो नाश करणार आहे आणि आजारांपासून तुम्हाला संरक्षण देणार आहे.
मोबाईल फोन कव्हर होणार बॅक्टेरिया किलर
युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्डच्या (University of Sheffield) संशोधकांनी एक असा पदार्थ तयार केला आहे, ज्याचा वापर जास्तीत जास्त वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर (उदा. मोबाईल दरवाजांचे हँडल, खेळणी इ.) केला जाऊ शकतो.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटीमायक्रोबियल पदार्थ बायोकोटे बी 65003 ला लेजर सिनटेरिंग पावडर सोबत एकत्र केलं आहे आणि एक अँटीमायक्रोबियल पदार्थ तयार केला आहे. ज्याचा वापर प्रत्येक प्रकारच्या वस्तूंमध्ये केला जाऊ शकतो.
थ्री डी प्रिंटिंगशी जोडला जाणार पदार्थ
संशोधनानुसार या पदार्थाला थ्री डी प्रिटिंग पद्धतीसोबत जोडलं जाऊ शकतं. यापासून तयार करण्यात आलेल्या वस्तू घातक अशा विषाणूंना मारण्यास पूर्णपणे सक्षम असतील.
हेदेखील वाचा - महाभयंकर कॅन्सरला दूर ठेवायचं आहे... मग फक्त 20 मिनिटं चाला
प्रयोगशाळेत अनेक विषाणूंवर याचं परीक्षण करण्यात आलं आहे. बहुतेक अशा आजाराच्या विषाणूंचा नाश करण्यात हा पदार्थ सक्षम असल्याचं दिसून आलं आहे. या पदार्थाचा प्रयोग लॅबमध्ये निर्मित मानवी पेशींवरही करण्यात आला आणि मानवी पेशींसाठी सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, या पदार्थाचा वापर नियमित वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर केला जाऊ शकतो.
युनिव्हर्सिटी ऑफ शेफील्डचे संशोधक कँडिस मॉज्युस्की यांनी सांगितलं, “घातक अशा बॅक्टेरियांना पसरण्यापासून रोखणं, त्यांचा संसर्ग आणि अँटिबायोटिक्सना दाद न देणारे विषाणू हे सर्व चिंताजनक आहे. सध्या तरी कोणत्याही थ्री डी प्रिंटेड उत्पादनांमध्ये काही विशेष नाही. उत्पादनांची निर्मिती करताना दर त्यात अँटी बॅक्टेरिअल पदार्थाचा वापर केला, तर अशा अनेक समस्यांवर उपाय म्हणून फायदेशीर ठरेल”
हेदेखील वाचा - उंदीर झाला पांढरा... कारण जाणा, वेळीच सावध व्हा नाहीतर तुमचीही होईल हीच अवस्था मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.