ग्लुकोमीटर, इन्सुलिन इंजेक्शन-पेनची नाही गरज; Diabetes साठी फक्त स्मार्ट पॅच पुरेसंं

ग्लुकोमीटर, इन्सुलिन इंजेक्शन-पेनची नाही गरज; Diabetes साठी फक्त स्मार्ट पॅच पुरेसंं

मधुमेही रुग्णांच्या (Diabetes patient) रक्तातील साखरेची पातळी (Blood glucose level) तपासणारं आणि इन्सुलिन (Insulin) रिलीज करून ती नियंत्रणात करणारं स्मार्ट इन्सुलिन पॅच (Smart insulin patch) तयार केलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 12 फेब्रुवारी : मधुमेही रुग्णांना (Diabetes patient) आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित (Blood glucose level) ठेवणं खूप गरजेचं असतं. ग्लुकोमीटरच्या मदतीने घरच्या घरी रक्तातील साखरेची पातळी मोजली जाते आणि त्यानुसार ती नियंत्रणात ठेवण्यासाठी इन्सुलिन इंजेक्शन किंवा इन्सुलिन पेनमार्फत इन्सुलिन (Insulin) शरीरात रिलीज केलं जातं. मात्र लवकरच मधुमेही रुग्णांना आता हे ग्लुकोमीटर, इन्सुलिन इंजेक्शन आणि इन्सुलिन पेनची गरज पडणार नाही कारण या सर्वांचं काम एकटाच करेल तो म्हणजे स्मार्ट इन्सुलिन पॅच (Smart insulin patch)

युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिना (UNC School of Medicine) आणि मॅचेस्युट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (Massachusetts Institute of Technology) संशोधकांनी मधुमेही रुग्णांसाठी स्मार्ट इन्सुलिन पॅच तयार केला आहे. ज्याबाबत जर्नल नेचर बायोमेडिकल इंजीनिअरिंगमध्ये माहिती देण्यात आली आहे. या पॅचमुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी तपासणं आणि त्याला नियंत्रित करणं आता आणखी सोपं झालं आहे.

हेदेखील वाचा -  लघवी, रक्ताशिवाय आता अश्रूंमधूनही ओळखता येणार डायबेटिज

कसा आहे स्मार्ट इन्सुलिन पॅच

हा पॅच पॉलीमरपासून बनवण्यात आला आहे, जो त्वचेवर चिकटतो.

एका नाण्याच्या आकाराचा असलेला हा पॅच वापरणं खूपच सोपं आहे.

हा पॅच रक्तातील साखरेची पातळी मोजतो आणि गरज असल्यास इन्सुलिनही रिलीज करतो.

संशोधकांच्या मते, या पॅचवर सूक्ष्म अशा सुया आहेत, ज्यामध्ये इन्सुलिन भरलेलं आहे. एका सुईची लांबी एक मिलीमीटर आहे. त्वचेवर हा पॅच लावताच त्यातील सुई त्वचेत रुतते. यानंतर रक्तातील पातळी किती आहे ते तपासून त्यानुसार इन्सुलिन रिलीज करते. जेव्हा साखरेची पातळी सामान्य स्तरावर येते. तेव्हा पॅचमधील इन्सुलिनचा स्रावही कमी होतो. इन्सुलिनच्या ओव्हारडोसचा धोकाही नसतो.

इन्सुलिनचा ओव्हरडोस झाल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण खूपच कमी होऊन चक्कर येऊ शकते, किंवा व्यक्ती कोमामध्ये जाण्याचा धोका वाढतो.

हेदेखील वाचा -  डायबेटिज रुग्णांनो अशी काळजी घ्याल, तर बळावणार नाहीत त्वचेच्या समस्या

संशोधनाचे प्रमुख अभ्यासक जेन गू यांनी सांगितलं की, मधुमेही रुग्णांचं आरोग्य आणि आयुष्य सुधारणं हा आमचा प्रमुख उद्देश आहे. तर अभ्यास रॉबर्ट लँगर यांनी सांगितलं की, हा स्मार्ट इन्सुलिन पॅच प्रभावी दिसून आलं आहे आणि लवकरच उपचारासाठी याचा वापर होऊ शकेल.

First published: February 12, 2020, 6:57 PM IST

ताज्या बातम्या