लघवी, रक्ताशिवाय आता अश्रूंमधूनही ओळखता येणार डायबेटिज

लघवी, रक्ताशिवाय आता अश्रूंमधूनही ओळखता येणार डायबेटिज

मधुमेही रुग्णांच्या (Diabetic patient) साखरेची पातळी (sugar level) ओळखण्यासाठी एक नवं स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स (Contact lens) तयार करण्यात आलं आहे.

  • Share this:

सियोल, 29 जानेवारी : मधुमेही रुग्णांना (Diabetic patient) सातत्याने रक्तातील साखरेची पातळी (sugar level) तपासावी लागते. यासाठी लघवी किंवा रक्ताचे नमुने घेतले जातात. घरच्या घरी रक्तातीत साखरेची पातळी तपासण्यासाठी ग्लुकोमीटरचा (glucometer) वापर केला जातो. मात्र आता कॉन्टॅक्ट लेन्स (contact lens) वापरूनही रक्तातील साखरेची पातळी ओळखता येणार आहे.

दक्षिण कोरियातील Pohang University of Science & Technology (POSTECH) च्या संशोधकांनी मधुमेही रुग्णांसाठी एक स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स विकसित केलं आहे. जे फक्त रक्तातील साखरेची पातळीच तपासणार नाही, तर डायबेटिक रेटिनोपॅथी (diabetic retinopathy) म्हणजे मधुमेहामुळे होणारा डोळ्यांचा आजार यावरही उपचार करू शकतं. नेचर रिव्ह्यु मटेरियल (Nature Reviews Materials) या जर्नलमध्ये या उपकरणाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा - 'ही' टेस्ट वाचवणार तुमच्या डोळ्यांची दृष्टी

मधुमेह तपासण्यासाठी रक्ताच्या नमुन्याची गरज नाही

ग्लुकोमीटरने रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी रक्ताचा नमुना लागतो. मात्र स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्सला रक्ताच्या नमुन्याची गरज नाही. फक्त डोळ्यांमधील रक्तवाहिन्यांतील रक्त आणि अश्रूंतून रक्तातील साखरेच्या पातळीची माहिती हे स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्स देऊ शकतात.

डायबेटिक रेटिनोपॅथीवरही (मधुमेहामुळे डोळ्यांच्या समस्या) उपचार

या स्मार्ट कॉन्टॅक्ट लेन्सचा प्रयोग सशावर करण्यात आला, ज्याला डायबेटिक रेटिनोपॅथी होता. महिनाभरानंतर तपासणी केली असता, सशाच्या डोळ्यातील ही समस्या कमी दिसून आली. लवकरच या कॉन्सटॅक्ट लेन्सचा प्रयोग माणसांवरही केला जाणार आहे.

हेदेखील वाचा - स्मार्टफोन कव्हर होणार ‘बॅक्टेरिया किलर’, तुमचं आजारांपासून करणार संरक्षण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2020 06:08 PM IST

ताज्या बातम्या