फक्त 80 रुपयात खरेदी करा युरोपात आलिशान घर, ‘या’ देशात होत आहे घरांचा लिलाव

फक्त 80 रुपयात खरेदी करा युरोपात आलिशान घर, ‘या’ देशात होत आहे घरांचा लिलाव

या देशात घर खरेदी करण्यासाठी आहे फक्त एक अट आणि घर होणार तुमच्या नावावर.

  • Share this:

सिसिली, 04 ऑक्टोबर : जर तुम्हाला कोणी सांगितलं की 80 रुपयात तुम्हाला घर मिळत आहे, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. मात्र असे शक्य आहे, ते ही भारतात नाही तर परदेशात. इटलीमध्ये तुम्ही फक्त 80 रुपयांमध्ये घर विकत घेऊ शकतात, यासाठी घरांच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. आता तुम्ही विचार कराल की, इटलीमध्ये 80 रुपयांमध्ये घर का विकले जात आहे. याचे कारण म्हणजे इटलीची लोकसंख्या.

कमी लोकसंख्या असलेल्या इटलीतील सिसिली द्वीपमध्ये संबूका गाव आहे. या गावातील लोकसंख्या कमी असल्यामुळं येथील सरकारनं नव्या घोषणा जाहीर केल्या आहेत. सिसिली येथील नगरपरिषदेत इतर देशांतील लोकांना घर घेण्याची विनंती केली आहे.

इटलीमधील सिसिला या गावाची लोकसंथ्या केवळ 5 हजार 800 आहे. या गावातील लोक इतर देशांमध्ये राहण्यास गेले आहे. त्यामुळं संबूका येथील नगर परिषदेनं गावात रिकामी असलेल्या घरांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं जगभरातील लोकं आता, फक्त 80 रुपयांमध्ये इटलीमध्ये घर घेऊ शकतात. या गावातील घरांच्या किमती 80 रुपयांपासून सुरु होणार आहेत.

लिलावाला झाली सुरुवात

संबूका गावचे महापौर लियोनार्डो सिकासियोनं यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर परिषदेनं या घरांना विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर या घरांचा लिलाव होणार आहे. सुरुवातीला 16 घरांची विक्री होणार आहे. एवढेच नाही तर सर्व घरं विदेशातील लोकांनी खरेदीही केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे यात चित्रकार, गीतकार आणि कलाकारांचा समावेश आहे. यातील घरांच्या किंमती या जागेनुसार असणार आहेत. यात 80 रुपये, 100 रुपये यांपासून सुरुवात होत आहे.

घर घेण्यासाठी या आहेत महत्त्वाच्या अटी

संबूका येथील घरे खरेदी करण्यासाठी फक्त एक महत्त्वाची अट आहे. ती म्हणजे घरांची दुरुस्ती करण्यासाठी स्वत: खर्च करावा लागणार आहे. तसेच, घर खरेदी करण्यासाठी 5 हजार पाऊंड म्हणजे चार लाख रूपये रिफंडेबल सिक्योरिटीमध्ये जमा करावी लागणार आहे. ही रक्कम सरकार काही कालावधीनंतर परतही करणार आहे. त्याचबरोबर घरांची दुरुस्ती करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

VIDEO: प्राण्याचा मुखवटा लावून चोराचा सराफाच्या दुकानावर डल्ला

Published by: Priyanka Gawde
First published: October 5, 2019, 10:41 AM IST
Tags: italy

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading