बीजिंग, 25 मे : अनेकांना कुत्रे, मांजर
(Cat) असे प्राणी पाळायला आवडतात. लहान मुलांना तर यांचं विशेष आकर्षण असतं. आपल्या मुलांचा हट्ट म्हणून पालकही त्यांना असे पाळीव प्राणी घेऊन देतात, जे या मुलांचे सोबती होतात. या प्राण्यांना लळा लावल्यामुळे आपल्या मालकावरसुद्धा ते तितकंच प्रेम करतात. त्यांना कोणतीही हानी पोहोचवत नाहीत. पण प्रत्यक्षात या प्राण्यांनी तुम्हाला दुखापत केली नसली तरी अप्रत्यक्षपणे हे प्राणी तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. सध्या असंच एक भयंकर प्रकरण समोर आलं आहे. एका चिमुरडीला तिच्या मांजरामुळे गंभीर इन्फेक्शन
(Girl infected by cat) झालं आहे.
चीनच्या
(China) शेनझेन शहरातील एका लहान मुलीला मांजरामुळे असं इन्फेक्शन झालं आहे, ज्यामुळे तिच्या डोक्यावरील केस गळू लागले आहेत
(Girl loses hair). आपल्या लेकीला कोणतीही हानी पोहोचवणार नाही, अशी मांजर त्यांनी खेळायला दिली. पण याच मांजरीने या पालकांना अडचणीत टाकलं आहे.
हे वाचा - 5 महिन्यांत 7 वेळा इन्फेक्शन, सातवी सर्जरी; ब्लॅक फंगसमुळे तरुणाची भयंकर अवस्था
मिररच्या रिपोर्टनुसार या मुलीला मांजरामुळे टिनिया कॅपिटिस झालं आहे. हा आजार असलेल्या कोणताही प्राणी किंवा माणसांच्या संपर्कात आल्यास होतो. यामध्ये डोक्यावर एखाद्या डागाप्रमाणे छोटे छोटे पुरळ येतात. केस भरपूर प्रमाणात गळतात (Girl's hair fall). डोक्यामध्ये खाज येते. डोक्यावरील त्वचा कोरडी पडते.
हे वाचा - ...तर रुग्णाला फुलांमुळेही जीवघेण्या आजाराचा धोका; डॉक्टरांनी केलं सावध
अँटीफंगल औषधाने यावर उपचार होतात. जवळपास चार आठवड्यांत हे इन्फेक्शन बरं होतं. पण मुलीचे केस इतक्या प्रमाणात गळत आहेत, की मुलीसह आता पालकांनाही तिची चिंता वाटते आहे. जोपर्यंत हे ठिक होत नाही तोपर्यंत तिला आपल्या डोक्यावरील केस काढावे लागतील म्हणजेच टक्कल करावं लागेल, असं तिच्या पालकांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.