VIDEO: छोट्याशा मैत्रिणीचा बॉल मिळवण्यासाठी कुत्र्यानं केलं असं काही, नेटकरी झाले भावुक

VIDEO: छोट्याशा मैत्रिणीचा बॉल मिळवण्यासाठी कुत्र्यानं केलं असं काही, नेटकरी झाले भावुक

लहान मुलांना कुत्री आणि मांजरं खूप आवडतात. एक मुलगी आणि कुत्र्यामधील हा बॉण्ड तुम्हाला इमोशनल करेल. पाहा VIDEO

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : सोशल मीडियाच्या जगात सतत काहीतरी लाईव्ह आणि भन्नाट गोष्टी पाहायला मिळत असतात. या गोष्टी पाहून आपल्याला कधी आनंद होतो, तर कधी डोळे पाणावतात. कधी आपण अस्वस्थ होतो तर कधी आयुष्यातल्या गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी त्यातून मिळते.

आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (video viral on social media) होतो आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला कळेल, की कुत्र्याला माणसाचा प्रामाणिक मित्र का म्हटलं जातं.

माणसाचं आणि कुत्र्याचं नातं अगदीच जुनं आहे. हा प्राणी आपली मैत्री केवळ प्राण्यांसोबत नाही तर माणसासोबतही अतिशय प्रामाणिकपणे करतो. कुत्रा हा अतिशय इमानी प्राणी म्हणून ओळखला जातो. आताही कुत्र्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सुसांता नंदा या आयएफएस अधिकाऱ्यानं हा व्हिडिओ (video by Susanta Nanda IFS on twitter) शेअर केला आहे.

हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरलही होतो. एक छोटी मुलगी आणि एका पाळीव कुत्र्याचा (small girl and dog) व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं आहे, एक मुलगी तिचा चेंडू आणण्यासाठी नदीत जाण्याचा सारखा प्रयत्न करते आहे. (girl trying to get ball video)

मात्र तिथंच बसलेला कुत्रा तिला तिला सारखा मागं ओढतो आहे. इतकंच नाही तर छोट्याशा मुलीला वाईट वाटू नये म्हणून हा कुत्रा स्वतःच नदीपात्रात उतरून अतिशय कौशल्यानं तो बॉल काढून आणतो.(dog taking out the ball from river video)

हेही वाचा हत्तीनं उंटासाठी असं काही केलं की, VIDEO पाहून म्हणाल वाह 'ही खरी मैत्री'!

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे कळू शकलेलं नाही. मात्र लोक भरभरून या कुत्र्याचं कौतुक करताना दिसत आहेत. या मुलीचं आणि कुत्र्याचं नातं अनेकांच्या मनाला स्पर्शून जातो आहे. लोक कमेंट्समध्ये लिहीत आहेत, की जनावरांना प्रेमाची भाषा फार लवकर समजते.

Published by: News18 Desk
First published: February 27, 2021, 8:51 AM IST

ताज्या बातम्या