मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हा असू शकतो खराखुरा 'चाँद का टुकड़ा'! पृथ्वीच्या अगदी जवळ अनेक वर्षांपासून आहे हा रहस्यमय लघुग्रह

हा असू शकतो खराखुरा 'चाँद का टुकड़ा'! पृथ्वीच्या अगदी जवळ अनेक वर्षांपासून आहे हा रहस्यमय लघुग्रह

2016 मध्ये अंतराळात अशीच एक गोष्ट संशोधकांच्या नजरेत आली होती. नंतर त्यांनी तिचा अभ्यास सुरू केला. तो एक लघुग्रह (Asteroid) असून, तो चंद्राचा तुकडा असण्याची शक्यता आहे.

2016 मध्ये अंतराळात अशीच एक गोष्ट संशोधकांच्या नजरेत आली होती. नंतर त्यांनी तिचा अभ्यास सुरू केला. तो एक लघुग्रह (Asteroid) असून, तो चंद्राचा तुकडा असण्याची शक्यता आहे.

2016 मध्ये अंतराळात अशीच एक गोष्ट संशोधकांच्या नजरेत आली होती. नंतर त्यांनी तिचा अभ्यास सुरू केला. तो एक लघुग्रह (Asteroid) असून, तो चंद्राचा तुकडा असण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन, 12 नोव्हेंबर: ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पोटामध्ये जगाच्या निर्मितीची अनेक रहस्यं दडलेली आहेत, त्याचप्रमाणे आपल्या अवकाशामध्येही अनेक गुपितं दडलेली आहेत. अंतराळ संशोधक (Space researcher) अवकाशातली गुपितं शोधून काढण्याचं काम करत असतात. कधी-कधी काही अद्भुत गोष्टी त्यांच्या नजरेस पडतात. 2016 मध्ये अशीच एक गोष्ट संशोधकांच्या नजरेत आली होती. नंतर त्यांनी तिचा अभ्यास सुरू केला. तो एक लघुग्रह (Asteroid) असून, तो आपल्या चंद्राचा तुकडा असण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांचा हा अंदाज खरा ठरला, तर चंद्राचा तुकडा असलेला हा लघुग्रह पृथ्वीच्या सर्वांत जवळ असणारा खगोलीय घटक ठरू शकतो.

पृथ्वीच्या कक्षेजवळ असल्यानं, हा लघुग्रह अर्ध-उपग्रह श्रेणीमध्ये बसतो. अर्ध-उपग्रह हे असे खगोलीय घटक असतात जे पृथ्वीच्या अगदी जवळ राहून सूर्याभोवती फिरतात. खगोलशास्त्रज्ञांनी यापूर्वी अनेक अर्ध-उपग्रह शोधले आहेत. हवाईमधल्या PanSTARRS दुर्बिणीचा वापर करून खगोलशास्त्रज्ञांनी 2016मध्ये या लघुग्रहाचा शोध लावला होता. त्यांनी त्याला कामोओलेवा (Kamo'oalewa) असं नाव दिल होतं.

त्यानंतर दक्षिण अ‍ॅरिझोनामधल्या पर्वताच्या शिखरावर बसवण्यात आलेल्या मोठ्या आणि शक्तिशाली दुर्बिणीचा (Telescope) वापर करून संशोधकांनी या लघुग्रहाला जवळून पाहण्याचा प्रयत्न केला होता. लघुग्रहाचं बारकाईने निरीक्षण करण्यासाठी शास्त्रज्ञ अॅरिझोनामधल्या दुर्बिणीला दर वर्षी एप्रिलमध्ये भेट देतात. नवभारत टाइम्सने याबाबत दिलं आहे.

हे वाचा-निरोगी हृदयासाठी रात्री यावेळात झोपी जाणं आहे फायदेशीर; नवीन संशोधनातील निष्कर्ष

दर वर्षी एप्रिल महिन्यामध्ये हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येतो. त्यामुळे आपल्या सर्वांत शक्तिशाली दुर्बिणी काही काळ त्याला टिपू शकतात. एप्रिल महिन्यात हा लघुग्रह पृथ्वीपासून सुमारे 9 दशलक्ष मैल किंवा 14.4 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असतो. एखाद्या फेरीस व्हीलसारखा आकार असलेल्या या लघुग्रहाचा व्यास 190 फुटांपेक्षा (58 मीटर) जास्त नसल्याचा अंदाज आहे.

नेचर कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायर्न्मेंट मॅगझिनमध्ये 11 नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या लेखानुसार, संशोधकांना एक छोटा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ फिरताना दिसला होता. हा लघुग्रह चंद्राचाच एक तुकडा असू शकतो आणि प्राचीन काळी तो चंद्रापासून विलग झालेला असू शकतो, असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. हा अंदाज खरा असल्याचं सिद्ध झालं तर हा लघुग्रह चंद्रापासून जन्माला आलेला पृथ्वीजवळचा पहिला खगोलीय घटक ठरेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते, कामोओलेवाचा अभ्यास केल्यास पृथ्वी आणि चंद्राच्या इतिहासावर प्रकाश टाकण्यास मदत होऊ शकते. हा लघुग्रह उघड्या मानवी डोळ्यांना दिसणाऱ्या वस्तूपेक्षा सुमारे 4 दशलक्ष पटींनी धूसर दिसतो.

हे वाचा-चिनी अध्यक्षांच्या नावाचं स्पेलिंग Xi Jinping आहे, तरीही उच्चार शी जिनपिंग का?

या लघुग्रहाच्या अभ्यासातून चंद्राची निर्मिती कशी झाली, याबाबत सविस्तर माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या अंतराळ संशोधक त्याचा अभ्यास करण्यात व्यग्र आहेत.

First published:

Tags: Moon, अंतराळ