मुंबई, 03 फेब्रुवारी : राज्याच्या बहुतांश भागांत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कमाल तापमान वाढत आहे. अनेक भागांत दुपारी तीव्र उष्मा जाणवू लागला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच पंखा, एसी किंवा कूलर खरेदी करण्याच्या प्रमाणात वाढ होते. अधिक गारवा मिळावा या उद्देशाने पंख्यांऐवजी एसीला प्राधान्य दिलं जातं; पण एसीच्या किमती खूप जास्त असतात. अशा वेळी कमी किंमत आणि चांगली फीचर्स असलेला एसी खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो.
तुम्ही देखील उन्हाळा सुसह्य करण्यासाठी पोर्टेबल एसी खरेदी करायचा विचार करत असाल तर सध्या मार्केटमध्ये वाजवी किंमत आणि चांगले फीचर्स असलेले पोर्टेबल एसी उपलब्ध आहेत. हे एसी घरात कुठेही फिट करायची गरज नाही. याचाच अर्थ हे एसी मूव्हेबल आहेत. अशाच काही खास एसी मॉडेल्सविषयी जाणून घेऊया.
उन्हाळ्यात एसीला मागणी वाढते. खास फीचर्स आणि वाजवी किंमत असलेल्या एसीला चांगली मागणी असते. लॉइडच्या एक टन क्षमतेच्या 3 स्टार पोर्टेबल एसीमध्ये अशीच काही खास फीचर्स आहेत. हा एसी तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. या एसीची किंमत 40 हजार रुपये आहे. 13 टक्के डिस्काउंटनंतर हा एसी तुम्ही 34,599 रुपयांत खरेदी करू शकता.
अक्रोडप्रमाणेच त्याचे तेलही असते गुणकारी, फायदे वाचाल तर नक्कीच कराल वापर!
तसंच या एसीच्या खरेदीसाठी काही बँकांच्या ऑफर्सदेखील आहेत. डीबीएस बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला वेगळा 10 टक्के डिस्काउंट मिळू शकतो. आयडीबीआयच्या कार्डवरही अशा प्रकारची ऑफर उपलब्ध आहे. लॉइडचा हा पोर्टेबल एसी चांगला पर्याय ठरू शकतो.
ब्लूस्टार एक टन पोर्टेबल एसी विजय सेल्समधून खरेदी करू शकता. सध्या या एसीवर बंपर सूट मिळत आहे. या एसीची किंमत 39,000 रुपये आहे; पण 15 टक्के डिस्काउंटसह हा एसी 32,990 रुपयांत खरेदी करू शकता. तसंच काही निवडक क्रेडिट कार्डवर या एसीच्या खरेदीवर 5 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे.
सिंफनीच्या मूव्हीकूल एक्सआय 100 जी या कूलरची किंमत 34,800 रुपये आहे. याचा अर्थ पोर्टेबल एसीच्या तुलनेत सिंफनीचा हा कूलर महाग आहे; पण हादेखील उपयुक्त ठरू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Summer season