आई होण्यासाठी झोपेची वेळ महत्त्वाची; प्रजनन क्षमतेवर परिणाम करतेय झोप

आई होण्यासाठी झोपेची वेळ महत्त्वाची; प्रजनन क्षमतेवर परिणाम करतेय झोप

तुम्ही कधी झोपता (sleeping) आणि कधी उठता याचा प्रजननक्षमतेवरही परिणाम होतो.

  • Last Updated: Dec 10, 2020 02:20 PM IST
  • Share this:

प्रत्येक आई आपल्या मुलांना रात्री लवकर झोपायची (sleep) आणि सकाळी लवकर उठायची शिकवण देत असते, पण संशोधकांच्या मते प्रत्येक महिलेनं जिला गर्भवती व्हायचं आहे तिनंह याचा अवलंब करायला हवा. जी महिला रात्री लवकर झोपते आणि सकाळी लवकर उठते ती गर्भवती होण्याची शक्यता जास्त असते.

ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ वारविकच्या संशोधकांच्या मते, रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या महिलांच्या तुलनेत लवकर झोपणाऱ्या महिलांची जीवनशैली जास्त आरोग्यदायी असते. लवकर झोपणाऱ्या महिलांचं वजन कमी असतं. त्यांना मधुमेह, हृदय रोग होण्याचा धोका कमी असतो. जर या समस्या असतील तर त्या गर्भधारणा होण्याच्या संभाव्यतेला प्रभावित करतात. या अभ्यासाचे निष्कर्ष ब्रिटिश फर्टिलिटी सोसाइटीच्या वार्षिक संमेलनात सादर केलं गेलं होतं.

myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, रात्री लवकर झोपण्यानं शरीर ऊर्जावान आणि ताजेतवानं राहतं. तर myupchar.com चे डॉ. विशाल मकवाना म्हणाले, गर्भधारणा वास्तवात एक कठीण प्रक्रिया आहे. त्याच्या अनेक पायऱ्या आहेत आणि सर्व कार्य शुक्राणू (पुरुषाचे वीर्य) आणि बीजांडं (स्त्रीच्या शरीरातील अंडे) यांचं असतं. गर्भवती होण्याच्या शक्यता वाढण्यासाठी इतर अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात.

अँटीऑक्सिडंट भरपूर असलेले खाद्यपदार्थ खावे

जर महिला स्वस्थ असेल तर गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते. त्यात संतुलित आहार मदत करतो. योग्य प्रमाणात प्रथिनं, खनिजं, आणि माइक्रोन्युट्रीएंट्स मिळायला हवे. अधिक अँटीऑक्सिडंटयुक्त खाद्य पदार्थ जसे फळं, भाज्या, शेंगा आणि धान्यं आहारात असायला हवीत. हे खाद्यपदार्थ जीवनसत्व सी आणि ई, फोलेट, बीटा-केरोटीन आणि ल्युटिनसारख्या अँटीऑक्सिडंटनं युक्त असतात. अँटीऑक्सिडंट  अशा मुक्त कणांशी लढतात जे शुक्राणू आणि बीजांडाला नुकसान पोहोचवू शकतात.

क्रियाशील राहा

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की नियमित रूपाने मध्यम तीव्रतेचे व्यायाम जसं चालणं, योग अथवा घरातील कामं केल्याने महिलांची प्रजानन क्षमता वाढते. अत्याधिक श्रमाचे व्यायाम करू नका त्यानं विपरित परिणाम होऊ शकतो. खूप जास्त व्यायाम केल्याने शरीरातील ऊर्जेचं संतुलन प्रभावित होतं आणि गर्भवती होण्याची शक्यता कमी होते.

तणाव कमी करा

जास्त तणाव कोर्टिसोलच्या वाढत्या पातळीचा परिणाम असतो त्याने शरीरातील हार्मोनचं संतुलन प्रभावित होते आणि गर्भधारणेची संभावना कमी होते. म्हणून जर गर्भवती होण्याचा प्रयत्न करत असाल तर तणाव कमी ठेवा. ध्यान हे तणाव कमी करण्याचा साधा सरळ मार्ग आहे.

वजनावर लक्ष ठेवा

अति कमी वजन आणि खूप जास्त वजन दोन्हीही महिलांच्या प्रजनन क्षमतेवर प्रभाव टाकतात. आपली प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी योग्य वजन राहिल याची काळजी घ्या. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे योग्य वजन राखण्याचे मार्ग आहे, त्यानं गर्भवती होणं आणि स्वस्थ बाळाला जन्म देण्याची शक्यता वाढते.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - गर्भधारणेत घ्यायची काळजी...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 10, 2020, 2:20 PM IST

ताज्या बातम्या