मुंबई, 26 मे : सध्याच्या धावपळीच्या काळात आपल्या दैनंदिन सवयींकडे आपल्याला फार बारकाईने लक्ष द्यावं लागतं. विशेषतः आपल्या खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयी (Eating And Sleeping Habits) योग्य आहेत की नाही हे काळजीपूर्वक पाहावं लागतं. खाण्यापिण्याच्या सवयीविषयी अनेकदा बोललं जातं. मात्र झोपेबद्दल बोलणंदेखील तितकंच गरजेचं आहे. आहाराचा जितका परिणाम आपल्या शरीरावर होतो. तितकाच परिणाम झोपेचादेखील होतो. त्यामुळे आपल्याला झोपेच्या योग्य सवयींबद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपल्या शरीरासाठी किती वेळेची झोप गरजेची असते. तसेच जेवल्यानंतर किती वेळाने झोपावे (Whether Sleeping Right After Meal Is Right Or Wrong) याबद्दल आज आपण जणू घेणार आहोत.
जेवण केल्यानंतर लगेच झोपणे योग्य की अयोग्य ?
तुम्हाला जर जेवण केल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असेल. तर ही सवय तुमच्यासाठी अतिशय धोकादाय ठरू शकते (Sleeping Right After Meal Is Not Good For Health). जेवण केल्यानंतर लगेच झोपल्याने आपल्या शरीरावर त्याचा चुकीचा परिणाम होतो. कारण जेवण केल्यानंतर शरीरातील साखरेची पातळी वाढते आणि जेवण केल्यानंतर जे आपण लगेच झोपायला गेलो. तर ही साखर वापरली जात नाही. त्यामुळे आपली पचनक्रिया मंदावते (Slows Down The Metabolism) आणि वजन वाढणे (Weight Gain), शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे यासोबत अनेक आजारांचा धोकादेखील वाढतो. म्हणून जेवल्यानंतर लगेच झोपणे चुकीचे आहे.
जेवण केल्यानंतर किती वेळाने झोपावे ?
अनेकदा एका जागी बसून काम केल्यानंतर लोकं रात्री उशीरा जेवतात आणि जेवणानंतर लगेचच झोपतात. पण असं करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. दिवसाचं अखेरचं जेवण आणि झोपेच्या वेळेमध्ये किमान तीन तासांचं अंतर असणं गरजेचं आहे (There Should Be Gap Of Three Hours Between Meals And Bedtime). या तीन तासांच्या अंतरामध्ये पोटातून अन्न लहान आतड्यांकडे सरकतं आणि यामुळे पचनक्रिया सुरूळीत होण्यास मदत होते. त्याचबरोबर रात्री छातीत जळजळ होणे आणि निद्रानाशासारख्या समस्यादेखील उद्भवत नाहीत.
वाचा- बाईक राईड आणि साहसी खेळांची आवड आहे? भारतातील या 5 Road Tripला नक्की जा
आपल्या शरीराला किमान सात तासांची झोप गरजेची असते (Our Body Needs At least 7 Hours Of Sleep) आणि जेवण केल्यानंतर तीन तासांच्या अंतराने झोपणं आपल्या शरीरासाठी योग्य असतं. त्याचबरोबर आणखी काही सवयी आहेत ज्या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात. जसे की, जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. जेवणाच्या अगोदर किंवा जेवण केल्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतराने पाणी प्यावे. तसेच जेवण केल्यानंतर अर्ध्या किंवा एका तासाने शतपावली (Walking After Meal) करावी. म्हणजेच थोड्यावेळासाठी चालावे. या सर्व सवयी आचरणात आणल्यास आपल्या आरोग्याला याचा नक्कीच फायदा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Sleep