Home /News /lifestyle /

लॉकडाउनमुळे उडाली झोप? या दिवसात तुम्हालाही झोपेच्या समस्या असतील तर करा हे उपाय

लॉकडाउनमुळे उडाली झोप? या दिवसात तुम्हालाही झोपेच्या समस्या असतील तर करा हे उपाय

लॉकडाऊनमुळे लोकं दिवसभर घरात आहेत. अशात अनेकांना झोपेची समस्या उद्भवत आहे.

    मुंबई, 20 एप्रिल : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) वाचण्यासाठी लॉकडाऊनमुळे लोकं दिवसभर घरात आहेत. अशात अनेकांना झोपेची समस्या उद्भवत आहे. रात्री झोपायला गेल्यानंतर अजिबात झोप लागत नाही. या कुशीवरून त्या कुशीवर परतण्याशिवाय पर्याय नाही. तुमचीही अशीच अवस्था आहे का? तर यावर तज्ज्ञांनी उपाय सुचवलेत. मानसोपचार तज्ज्ञ काय सांगतात? किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजच्या मानसिक रोग विभागाचे प्रमुख डॉ. पीके दलाल यांनी सांगितलं, अशा समस्येसाठी झोपेचं औषध घेण्याची गरज नाही. लॉकडाऊनमुळे लोकं घरात आहेत, तर त्यांनी दिवसा नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर बेडवर असंच पडूही नका. घरातल्या घरात शक्य तितकं फिरा किंवा खुर्चीवर बसून राहा. खुर्चीवर डुलकी लागली तर काही समस्या नाही. मात्र जर तुम्ही बेडवर पडलात आणि तुम्हाला झोप लागली तर रात्री झोप न लागण्याची समस्या बळावू शकते. CoronaVirus चा धोका : होम डिलिव्हरी घेताना काय काळजी घ्याल? शिवाय रात्री तुम्हाला ज्या वेळेला झोपायची सवय आहे. त्याच वेळेला झोपा, त्यामुळे झोप चांगली लागेल. महत्त्वाचं म्हणजे झोपण्यापूर्वी 1 तास आधी टीव्ही पाहू नका किंवा मोबाईल वापरू नका. होमिओपॅथी तज्ज्ञ काय सांगतात? लखनऊच्या राजकीय नेशनल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर एबी सिंह म्हणाले, दिवसा वर्कआऊट करणंही खूप महत्त्वाचं आहे. यामुळे आपल्या शरीरातील कॅलरी बर्न होतात आणि थकवाही येतो आणि त्यामुळे रात्री झोपही चांगली लागते. मात्र झोपेची समस्या जास्तच असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. आयुर्वेदिक डॉक्टर काय सांगतात? उत्तराखंड आयुर्वेद विश्वविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सुरेश चौबे यांनी चांगल्या झोपेसाठी काही उपाय सांगितलेत. त्यांनी सांगितलं, आता गरमीचा मोसम आहे. अशात आहाराची काळजी घेण्याची गरज आहे. रात्री झोपण्यापूर्वी उकळत्या दुधात एक चमचा हळद आणि एक चमचा अश्वगंधा चूर्ण टाकून प्याल तर झोप चांगली लागेल. अश्वगंधा नाही मिळालं तर हळद पुरेशी आहे. शिवाय पाण्यात आलं, काळी मिरी आणि तुळस टाकून उकळून घ्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल आणि झोपही चांगली लागेल. Lockdown मुळे पार्लर बंद? नो टेन्शन, घरबसल्या अशी घ्या केसांची काळजी
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus, Sleep

    पुढील बातम्या