झोपण्याच्या या 4 पोझिशनमुळे शरीराला होतात अनेक फायदे!

सुदृढ आरोग्यासाठी किमान सात ते आठ तासांची गाढ झोप आवश्यक असल्याचं डॉक्टरांनी अनेकदा सांगितलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 03:26 PM IST

झोपण्याच्या या 4 पोझिशनमुळे शरीराला होतात अनेक फायदे!

सुदृढ आरोग्यासाठी किमान सात ते आठ तासांची गाढ झोप आवश्यक असल्याचं डॉक्टरांनी अनेकदा सांगितलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की चांगल्या झोपेसाठी योग्य पोझिशनमध्ये झोपणंही आवश्य आहे. स्लीपिंग पोझिशनचाही तुमच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होत असतो. चला तर मग कोणती स्लीपिंग पोझिशन तुमच्यासाठी योग्य आहे ते जाणून घेऊ...

गुडघ्यांच्यामध्ये उशी घेऊन झोपणं- अनेकदा तुम्ही लोकांना उशी डोक्याखाली घेऊन झोपण्या ऐवजी गुडघ्यांच्यामध्ये घेऊन झोपताना पाहिलं आहे. या सवयीमुळे अनेकदा घरच्यांची बोलणीही खावी लागतात. पण या पोझिशनमध्ये झोपल्यामुळे शरीरातील थकवा कमी होतो आणि पायांना आराम मिळतो.

डोक्याखाली दोन उशा- अनेकांना झोपताना डोक्याखाली दोन उशा घेऊन झोपायची सवय असते. ज्यांना सायनसचा आजार असतो त्यांच्यासाठी ही पोझिशन फार लाभदायक आहे. तुम्हीही सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात तर झोपताना डोक्याखाली दोन उशा घेऊन झोपा, ज्यामुळे तुमचं डोकं झोपताना थोडं उंचीवर राहील.

पायांच्यामध्ये उशी- मासिक पाळीवेळी अनेकींना पाठ दुखीची समस्या निर्माण होते. या वेदनेपासून वाचण्यासाठी पायांच्यामध्ये उशी घेऊन झोपू शकता. यामुळे तुमची पाठ आणि पायदुखीला आराम मिळू शकतो.

पोटावर झोपण्याचे फायदे- जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर पाठीवर झोपण्यापेक्षा पोटावर झोपा. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 03:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...