Home /News /lifestyle /

Sleeping Tips: या वेळात तुम्ही पालथं झोपण्याची चूक करत नाही ना? कमी वयातच वयस्क दिसाल

Sleeping Tips: या वेळात तुम्ही पालथं झोपण्याची चूक करत नाही ना? कमी वयातच वयस्क दिसाल

ही सवय वयोमानानुसार परिणाम करू शकते. या पद्धतीनं झोपल्यामुळे शरीराला श्वास घेण्यात अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. कारण अशा प्रकारे झोपलेले शरीर ग्रॅविटी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाते.

    मुंबई, 23 जानेवारी : वाढत्या थंडीच्या (Winter) वातावरणात सकाळी थोडा वेळ जास्त झोपण्याची इच्छा होते. अलार्म वाजल्यानंतर आणि जाग आल्यानंतरही आणखी 10 मिनिटे झोपण्याची इच्छा अनेकांना असते. या दरम्यान आपण अशा पोजमध्ये झोपतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. विशेषत: पालथे किंवा पोटावर झोपणाऱ्या महिलांची झोपण्याची ही पद्धत हानिकारक असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत श्री वैद्य आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉ. दिनेश कुमार यांनी भास्करला माहिती (Wrong method of sleeping) दिली आहे. झोपेच्या चुकीच्या सवयीने वयस्क दिसाल दिवसभर घरातील कामं केल्याने रात्रीपर्यंत महिलांची दमछाक होते. पाठ आणि अंगात जडपणा आल्याने किंवा थंडीच्या वातावरणात पोटदुखीमुळे उलटे झोपण्याची चूक करतात. ही सवय वयोमानानुसार परिणाम करू शकते. या पद्धतीनं झोपल्यामुळे शरीराला श्वास घेण्यात अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. कारण अशा प्रकारे झोपलेले शरीर ग्रॅविटी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाते. अशा स्थितीत झोप पूर्ण झाल्यानंतरही शरीरातून ही समस्या उद्भवते, कारण शरीराच्या वरच्या भागाचा भार पूर्णपणे स्तनांवर येतो. यामुळे थकवा आणि सुस्ती येते. असं झोपणं आरोग्यासाठी हानिकारक का आहे? स्तन दुखणे - महिलांना अनेकदा या आसनात झोपल्याने स्तन दुखण्याची समस्या उद्भवते. तासन्तास असे पडून राहिल्याने स्तनावर दाब पडतो, त्यामुळे वेदना होतात. सुरकुत्या - पोटावर झोपल्यामुळे स्तनांव्यतिरिक्त चेहऱ्यावरही दाब येतो. त्यामुळे त्वचेतून हवेचे उत्सर्जन होत नाही आणि लहान वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आणि पिंपल्सची समस्या सुरू होते. अपचन - अशा प्रकारे झोपल्याने पोट दाबले जाते. यामुळे अन्न नीट पचत नाही, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होतो. हे वाचा - Tips For Proper Sleep: या गोष्टी खाणं ताबडतोब थांबवा; रात्री वारंवार झोपमोड होऊन दिवस जातो खराब डोकेदुखी - पोटावर झोपल्याने डोकेदुखीदेखील होऊ शकते. खरे तर अशा प्रकारे झोपेच्या वेळी मान सरळ राहू शकत नाही, त्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठाही प्रभावित होतो, ज्यामुळे डोकेदुखी तर कधी मानदुखीचा त्रास होऊ शकतो. गरोदरपणात धोका - गरोदरपणाच्या दुस-या आणि तिसर्‍या त्रैमासिकात असे झोपता येत नाही, परंतु पहिल्या तिमाहीत अशा प्रकारे झोपल्याने गर्भधारणेवर परिणाम होतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गरोदरपणात असे चुकूनही झोपू नये. हे वाचा - Coconut Benefits: रात्री झोपण्यापूर्वी ओलं खोबरं खाण्याचे इतके फायदे तुम्हाला माहीत नसतील पोटावर झोपणे कधी चांगले असते? पोटावर झोपण्याचे जसे अनेक तोटे आहेत तसेच त्याचे काही फायदेही आहेत. पोटावर झोपल्याने पाठ किंवा पोटदुखीच्या वेळी थोडा आराम मिळतो. ज्यांना घोरण्याचा त्रास आहे त्यांनी असेच झोपावे, मग घोरण्याचा आवाज मंद होतो. पण अशा प्रकारे झोपण्याची प्रक्रिया काही काळासाठीच फायदेशीर ठरते, हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. असे तासनतास झोपणे योग्य नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sleep, Sleep benefits

    पुढील बातम्या