मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Sleepiness after lunch: दुपारच्या जेवणानंतर दररोज येते झोप? धोकादायक ठरू शकते ही सवय

Sleepiness after lunch: दुपारच्या जेवणानंतर दररोज येते झोप? धोकादायक ठरू शकते ही सवय

 प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

दुपारी पोटभर जेवण झालं की झोप लागते. आपण ऑफिसमध्ये असलो तर आपल्याला दुपारच्या जेवणानंतर झोप घेता येत नाही. परिणामी आपल्याला आळस येतो, कामात लक्ष लागत नाही किंवा डोकेदुखी होते. तसेच कष्टाचं काम न करताही थकल्यासारखं वाटतं.

मुंबई, 26 मार्च: काही जणांना सकाळचा नाश्ता (Skipping breakfast) न करता फक्त दुपारी जेवायची सवय असते. मग दुपारी पोटभर जेवण झालं की झोप लागते. आपण ऑफिसमध्ये असलो तर आपल्याला दुपारच्या जेवणानंतर झोप घेता येत नाही. परिणामी आपल्याला आळस येतो, कामात लक्ष लागत नाही किंवा डोकेदुखी होते. तसेच कष्टाचं काम न करताही थकल्यासारखं वाटतं.

आता जेवल्यानंतर थकवा कशामुळे येतो, याबद्दल संशोधकांनी संशोधन केलंय. या सर्व संशोधकांचे यासंदर्भात वेगवेगळे सिद्धांत आहेत. परंतु जेवल्यानंतर झोप लागणं, ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्याचं ते मान्य करतात. जेवल्यानंतर थोडी झोप लागणं हे सामान्य आहे, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही नाही. परंतु जर दररोज दुपारच्या जेवणानंतर खूप झोप येत असेल आणि तुम्हाला थकवा वाटत असेल तर ते एखाद्या गंभीर आजाराचं लक्षणदेखील असू शकतं. दुपारच्या जेवणानंतर सुस्ती किंवा झोप येण्यामागे काय कारणं असू शकतात? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे वाचा-चेहऱ्याच्या या भागात वेदना जाणवत असतील तर दुर्लक्ष नको; Heart Attack मध्ये असं लक्षण दिसून आलंय

दुपारी जर तुम्ही पचायला जड जाणारं जेवण (Sleepiness after heavy lunch) केलं असेल तर त्यामुळे जास्त झोप येण्याची शक्यता असते. आपलं स्वादुपिंड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन तयार करतं. जेवण जितकं जड असेल तितकं जास्त इन्सुलिन तयार होतं, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. इन्शुलिनच्या या वाढीमुळे, आपलं शरीर झोपेचे हॉर्मोन तयार करतं. जे आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि मेलाटोनिनमध्ये रूपांतरित होतात आणि आपल्याला झोप येते. जर एखाद्याला झोप लागली, तर त्याची एनर्जी कमी होऊ लागते आणि आळस (laziness) येतो. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.

साल्मन, पोल्ट्री प्रॉडक्ट, अंडी, पालक, बिया, दूध, सोया प्रॉडक्ट, चीज यामध्ये प्रोटिनचं प्रमाण जास्त असतं. याशिवाय भात, पास्ता, ब्रेड, केक, कुकीज, मफिन्स, कॉर्न, दूध यामध्ये कार्ब जास्त असतं, त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्यानंतर झोप येण्याची शक्यता असते. तसंच तुमची झोप पूर्ण झाली नसेल तर त्यामुळेही दुपारी झोप येण्याची शक्यता असते. त्यामुळे रोज सात-आठ तासांची झोप घेणं आवश्यक असतं.

हे वाचा-स्ट्रेस घालवण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे; संशोधनातूनही आता झालं स्पष्ट

याशिवाय कायम झोप येण्यामागे डायबेटिस (diabetics), फूड अ‍ॅलर्जी, स्लिप एप्निया, एनिमिया, थायरॉईड (Thyroid ) किंवा पचनाशी संबंधित समस्यादेखील असू शकतात. त्यामुळे तुम्हाला दुपारी झोपेचा जास्त त्रास होत असेल किंवा शरीर सतत थकलेलं वाटत असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर करू शकता. त्यासाठी पुरेसं पाणी प्या, आवश्यक व्हिटॅमिन सेवन करा, जेवण कमी करा, पुरेशी झोप घ्या, नियमित व्यायाम करा, मद्य आणि कॅफिनचं सेवन कमी करा. या गोष्टी केल्यास तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होईल.

First published:

Tags: Health, Health Tips, Sleep