नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : आजच्या बदलत्या जीवनशैलीत निद्रानाश ही एक कॉमन समस्या म्हणून समोर येत आहे. अनेक वेळा असे घडते की, पुरेशी झोप न मिळाल्याने मनाची चिडचिड होते. त्याचा परिणाम आपल्या वागण्यावरही दिसून येतो. यूकेच्या एक्सेटर विद्यापीठाने (University of Exeter) केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, झोपेच्या समस्यांमुळे (Sleep problems) लोक काही प्रमाणात नकारात्मक होत आहेत. या अभ्यासानुसार, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या झोपेच्या कमतरतेमुळे ग्रस्त असलेल्या लोकांना कालांतराने नकारात्मक समज येऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि संज्ञानात्मक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. संशोधकांनी 50 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 4,482 लोकांचे सर्वेक्षण केले. लोक कोणत्या घटकांद्वारे स्वतःला निरोगी समजतात हे शोधणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता. अभ्यासात असे दिसून आले आहे की बहुतेक लोक त्यांच्या झोपेबद्दल चिंतित (Sleep problems increase negativity) होते.
ज्याप्रमाणे चांगल्या आरोग्यासाठी चांगला आहार आवश्यक आहे, त्याचप्रमाणे रात्रीची झोप देखील चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, रात्री झोप न मिळाल्यास त्याचा नकारात्मक परिणाम शरीरातील हार्मोन्स, मेंदूची कार्यक्षमता आणि इतर कार्यक्षमतेवर पडतो. गेल्या काही दशकांमध्ये झोपेच्या गुणवत्तेत आणि कालावधीत सातत्याने घट होत आहे.
हे वाचा - Health News: वेलचीचे आरोग्यासाठी आहेत हे 5 जबरदस्त फायदे, अनेक आजार राहतात दूर
अभ्यास कसा झाला?
एक्सेटर विद्यापीठातील संशोधक आणि या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका सेरेना सबातिनी यांनी सांगितले की, वयानुसार लोकांमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही बदल होतात, तर काही लोक अधिक नकारात्मक होतात. यासोबतच म्हातारे होण्याची कल्पनाही लोकांना नकारात्मक बनवते.
हे वाचा - Stomach Pain: थंडीच्या दिवसात तुम्हीही पोटदुखीनं त्रस्त आहात का? हे घरगुती उपाय ठरतील गुणकारी
या अभ्यासात असे दिसून आले आहे की, नीट झोप लागत नसल्यामुळे लोकांना वयस्क वाटतं आणि अधिक नकारात्मक भावना मनात निर्माण होतात. उदाहरणार्थ, या संशोधनादरम्यान एका व्यक्तीने सांगितले की, जर 6 तासांची चांगली झोप मिळाली तर मला अधिक लहान वाटते. तर दुसऱ्या एकानं असं सांगितलं की, मला खूप कमी झोप लागते, त्यावेळी माझ्या कार्यप्रणालीवर त्याचा वाईट परिणाम जाणवतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Sleep