Home /News /lifestyle /

झोप बिघडवतेय तुमची सेक्स लाइफ; लैंगिक क्षमतेवर होतोय परिणाम

झोप बिघडवतेय तुमची सेक्स लाइफ; लैंगिक क्षमतेवर होतोय परिणाम

प्रतीकात्मक फोटो.

प्रतीकात्मक फोटो.

झोप (Sleep) आणि लैंगिक समस्या यांचा एकमेकांशी संबंध असल्याचं संशोधनात दिसून आलं आहे.

वॉशिंग्टन, 04 मे : अपुऱ्या झोपेचे (Sleep) तसे बरेच गंभीर दुष्परिणाम आहेत. पुरेशी झोप न मिळाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. आता हीच अपुरी झोप तुमच्या लैंगिक आयुष्यावरही (Sleep and sex life) परिणाम करत असल्याचं दिसून आलं आहे. चांगली झोप नसेल तर महिलांच्या लैंगिक क्षमतेवर विपरीत परिणाम होतो, असं एका नव्या अभ्यासात आढळून आलं आहे. मध्यवयीन महिलांना झोपेच्या तसंच लैंगिक आरोग्याच्या (Sexual Dysfunction) समस्या जाणवत असतात. जवळपास निद्रानाशच (Insomnia) म्हणावं इतक्या टोकाची लक्षणं 26 टक्क्यांहून अधिक मध्यवयीन महिलांमध्ये दिसतात. तसंच मेनॉपॉझ (Menopause) म्हणजेच रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या महिलांपैकी सुमारे 50 टक्के महिलांना झोपेशी निगडित समस्या जाणवतात. आयुष्याच्या याच काळात 43 टक्के महिलांमध्ये लैंगिक समस्याही उद्भवतात. या पार्श्वभूमीवर झोप (Sleep) आणि लैंगिक समस्या यांमध्ये काही संबंध आहे का, हे शोधून काढण्यासाठी अनेक प्रकारचा अभ्यास आतापर्यंत करण्यात आला आहे. मात्र आतापर्यंतच्या बहुतांशअभ्यासांमध्ये लैंगिक मूल्यमापनात काही त्रुटी होती. अलीकडे नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात 3400 महिलांवरील निरीक्षणं नोंदवण्यात आली.  दी नॉर्थ अमेरिकन मेनॉपॉझ सोसायटीच्या (NAMS ) 'मेनॉपॉझ' जर्नलमध्ये हा लेख अलिकडेच ऑनलाइन प्रकाशित झाला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे. हे वाचा - एक्स बॉयफ्रेंडने ब्लॉक केल्याने भडकली महिला; बदला घेण्यासाठी केला नको तो प्रताप या महिला सरासरी 53 वर्षे वयाच्या होत्या. झोपेचा कालावधी, झोपेचा दर्जा (Quality of Sleep) आणि लैंगिक क्रिया यांच्या परस्परसंबंधांवर संशोधन करण्यात आलं. त्यात व्हॅलिडेटेडटूल्सचा (Validated Tools) वापर करण्यात आला. तसंच निष्कर्षावर परिणाम करू शकतील, अशा घटकांचा विचारही करण्यात आला. झोपेच्या कालावधीचा नव्हे, तर झोपेच्या दर्जाचा महिलांच्या लैंगिक क्रियांमधल्या (Sexual Activity) समस्यांशी संबंध आहे, असं शास्त्रज्ञांच्या या अभ्यासातून लक्षात आलं. चांगल्या दर्जाची झोप मिळाली (म्हणजे सलग, झोपमोड न होता गाढ झोप) तर लैंगिक क्रियांवर चांगला परिणाम दिसून येत असल्याचं आढळून आलं. हे वाचा - 3 महिने शी झाली नाही, तरुणाचा गेला जीव; रिपोर्ट पाहून डॉक्टरही झाले शॉक झोप (Sleep)आणि लैंगिक समस्या (Sexual Problems) असलेल्या महिलांवर उपचारांसाठी या नव्या संशोधनाचा उपयोग डॉक्टर्सना होणार आहे. आयुष्याच्या मध्यावर जाणवणाऱ्या या समस्यांचा स्त्रियांच्या आयुष्यावर फार विपरीत परिणाम होतो असं दिसून आलं आहे. 'सेक्शुअल डिस्फंक्शन आणि कमी दर्जाची झोप यांच्या परस्परसंबंधांवर या अभ्यासातून प्रकाश पडला आहे. त्यामुळे मध्यवयीन महिलांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे,' असं NAMS च्या वैद्यकीय संचालक आणि या संशोधनात सहभागी असलेल्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. स्टेफनी फॉबियन यांनी सांगितलं.
First published:

Tags: Sex, Sexual health, Sleep, Sleep benefits

पुढील बातम्या