Home /News /lifestyle /

रात्रीची झोप उडाली आणि काळजात भरली भीतीची धडकी

रात्रीची झोप उडाली आणि काळजात भरली भीतीची धडकी

झोपेचा (sleep) मानसिक आरोग्यावर (mental health) परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे.

    वॉशिंग्टन, 16 नोव्हेंबर : सध्या अनेकांना झोपेची समस्या उद्भवत आहे. कित्येकांना रात्रीची झोप लागत नाही किंवा उशिरानं झोपल्यानंतरही लवकर जाग येते. झोपेच्या समस्येचा परिणाम मेंदूवर होतो आहे. निद्रानाशामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवतात असं एका संशोधनात दिसून आलं आहे. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला. हे संशोधन बायोलॉजिकल सायकीअॅट्री : कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्स अँड न्युरोइमेजिंग या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. अर्धवट झोपेमुळे भीतादायक अनुभव विसरण्याची मेंदूची क्षमता कमी होते.  ज्यामुळे लोकांना प्रचंड ताण किंवा पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) सारख्या आजारांचा जास्त धोका असतो. संशोधकांनी स्लिप लॅबोरटरीमध्ये 150 निरोगी प्रौढांचा अभ्यास केला. त्यापैकी एक तृतीयांश लोकांना सामान्य झोप घेऊ दिली, एक तृतीयांश लोकांना मर्यादित झोप घेऊ दिली. ज्यांनी झोप अपुरी झाली किंवा अजिबात झोप मिळाली नाही, त्यांना भीतीदायक परिस्थितीचा सामना करावा लागला. अमेरिकेच्या पिट्सबर्ग विद्यापीठातील अभ्यास लेखक अ‍ॅनी जर्मेन म्हणाले, "आमच्या टीमनं भयानक आठवणींवर मात करण्यासाठी तीन-टप्प्यांचं एक्सप्रिमेंटल मॉडेल वापरलं आणि फंक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंगचा वापर करून त्यांचे मेंदू स्कॅन केले" हे वाचा - कोरोनामुळे OCD ग्रस्त व्यक्तींना अधिक धोका; अशी घ्या काळजी ! हे प्रयोग करताना मेंदूत अॅक्टिव्हिटी झाल्यावर मेंदूतील भावनांशी संबंधित कुठल्या भागातून प्रतिसाद मिळतोय हे ब्रेन इमेजिंगच्या माध्यमातून रेकॉर्ड करण्यात आलं. ज्यांना पुरेशी झोप मिळाली आणि ज्यांना नाही मिळाली त्यांच्य प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये वेगवेगळा बदल दिसून आला. तीन गटांपैकी ज्यांना फक्त अर्ध्या रात्रीची झोप लागली होती त्यांच्या मेंदूतील भीतीशी संबंधित भागात खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद निर्माण झाला आणि भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या भागात कमीतकमी प्रतिसाद निर्माण झाला, असं संशोधकांनी सांगितलं. विशेष म्हणजे ज्यांची झोप कमी झाली होती त्यामुळे मेंदूतील भीतीच्या भावनेशी संबंधित भागांमध्ये भीती वाटताना आणि ती विसरताना प्रतिसाद निर्माण झाले होते. हे वाचा - झणझणीत पदार्थ खाल्ल्यानं मिळू शकते गंभीर आजारांशी लढण्याची ताकद भीतीदायक अनुभव विसरल्यानंतर 12 तासांनी या लोकांच्या मेंदूतील प्रतिसाद हे सामान्य झोप घेतलेल्या लोकांप्रमाणचे होते. ज्यातून हे दिसून आलं की रात्री अजिबातच झोप न होण्यापेक्षा ती अर्धवट होणं जास्त भयंकर आहे. थोड्या प्रमाणात झोप न झालेल्या व्यक्तींना पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेड डिसऑर्डरचा सामना करावा लागू शकतो, असं संशोधक म्हणाले.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Sleep

    पुढील बातम्या