मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

छोट्या वाटणाऱ्या या 4 चुका तरुणांच्या चेहऱ्याचा स्मार्टनेस घालवतात; आजपासूनच बदला

छोट्या वाटणाऱ्या या 4 चुका तरुणांच्या चेहऱ्याचा स्मार्टनेस घालवतात; आजपासूनच बदला

सूर्यप्रकाश, प्रदूषण, घाम यांमुळे केवळ महिलांच्या त्वचेवरच नव्हे तर पुरुषांच्या त्वचेवरही पिंपल्स आणि फ्रिकल्सची समस्या सुरू होते. अनेक पुरुष स्कीन केअरमध्ये काही कॉमन चुका करतात, त्यामुळे त्यांचे स्कीन प्रॉब्लेम वाढतात. त्याविषयी आज जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 18 सप्टेंबर : महिलांप्रमाणेच पुरुषांनाही त्वचेचीही विशेष काळजी घ्यावी लागते. यामुळे त्यांची त्वचा चमकदार आणि तरुण राहू शकते. पुरुष देखील त्यांच्या रोजच्या रुटीनमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरून त्वचा अधिक तरुण राखू शकतात. स्किन केअर हा काही फक्त मुलींनीच करण्याचा विषय नाही मुलांनीही त्यांच्या ग्रूमिंग रुटीनमध्ये समावेश केला (Skincare Mistakes Most Men Make) पाहिजे.

बहुतेक पुरुष त्वचेची काळजी घेतात, परंतु माहितीच्या अभावामुळे ते अशा चुका करतात, ज्यामुळे त्यांच्या त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसान होते. जसे की शेव्हिंग क्रीम ऐवजी फोम वापरणे, शरीर आणि चेहऱ्यासाठी समान साबण वापरणे इ. पुरुष स्कीन केअर संबंधित नेमक्या कोणत्या चुका करतात, याविषयी जाणून घेऊया.

स्कीन केअर संबंधित या 4 चुका करणे टाळा -

शरीर आणि चेहऱ्यासाठी एकच साबण -

चेहऱ्याची त्वचा ही संवेदनशील असते. तिची विशेष काळजी घ्यावी लागते. आपण आंघोळीसाठी जो साबण वापरतो तोच चेहऱ्यासाठी वापरणे टाळा. पुरुषांच्या चेहऱ्यासाठी उपलब्ध असलेले फेसवॉश वापरावेत. तुम्ही चेहऱ्यासाठी ऑरगॅनिक घटकांनी तयार केलेला फेसवॉश वापरू शकता. इतकेच नाही तर अॅक्टिव्हेटेड चारकोल फेस वॉश देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

फोमिंग शेव्हिंग क्रीम -

तुम्ही फोमिंग शेव्हिंग क्रीम वापरत असाल तर तुमच्या त्वचेसाठी ते चांगले नाही. त्यामुळे आपल्या त्वचेचे संरक्षण होत नाही किंवा शेव्हिंग गुळगुळीत होत नाही. लोशनवर आधारित नो-फोम शेव्ह क्रीम वापरणे चांगले. त्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला लगेच फरक दिसून येईल.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

फेस वॉशचा वापर -

अनेक पुरुष असे असतात की, ते फेसवॉशने 3 ते 4 वेळा चेहरा धुतात. त्यामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा वाढतो आणि त्वचेवर ओलावा राहत नाही. अनेकांना मॉइश्चरायझर लावायलाही आवडत नाही. पण, जेव्हाही तुम्ही चेहरा स्वच्छ कराल तेव्हा चेहऱ्यावर मॉइश्चरायझर किंवा लोशन नक्कीच लावा.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

सनस्क्रीन -

सूर्यकिरणांमुळे चेहऱ्याच्या त्वचेचे खूप नुकसान होते. यासाठी सनस्क्रीन वापर आवश्यक आहे. मात्र, बहुतेक पुरुष त्याचा वापर टाळतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, मुलींच्या त्वचेशिवाय पुरुषांच्या त्वचेसाठीही SPF आवश्यक असते.

First published:

Tags: Skin, Skin care