31 मार्च : उन्हाळा सुरू झाला आहे, त्यामुळे या काळात आपल्या त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्या चेहऱ्याचं तेज कायम ठेवण्यासाठी नॅचरल फेसवॉश वापरा. पॉण्डस् स्किनच्या सल्लागार आणि त्वचा तज्ज्ञ रश्मी शेट्टी म्हणतात की, आर्द्रता, दमट तापमान, प्रदूषण, हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून आपल्या स्किनला धोका आहे. त्यामुळे आपणच आपल्या त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे.
वाढत्या गरमीमध्ये चेहऱ्यावर येणारा घाम आणि त्यावर बसणारी धूळ आपल्या त्वचेला निर्जीव बनवते, त्यामुळे चांगल्या कंपनीचे फेसवॉश वापरणं आवश्यक आहे.
एक्टीवेटेड कार्बनयुक्त फेसवॉश चेहऱ्याला खोलवर जाऊन चेहरा साफ करतो आणि त्यातून चेहऱ्याला स्क्रब केलं तर आणखीनच छान.
त्वचेच्या सौंदर्यासाठी मार्केटमध्ये अनेक कॉसमॅटिक्स आहेत. पण जे इंग्रेडिएंट्स त्वचेला हलका ग्लो देतील आणि त्याने त्वचेला थंडावा मिळेल असेच इंग्रेडिएंट्स आणि क्रिम वापरत जा.
सन्सस्क्रिन आणि विटामिन ई असलेल्या क्रिम्स् चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी योग्य ठरतील.
ह्या सगळ्यासोबतच त्वचेवर मॉइश्चराइजर क्रिम्सही वापरा. या क्रिम्स् वापरल्याने त्वचेवर एक लवचिकता राहते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा