थंडीत हुडहुडी घालवण्यासाठी तुम्ही उन्हात बसत आहात, मग 'हे' जरूर वाचा

थंडीत हुडहुडी घालवण्यासाठी तुम्ही उन्हात बसत आहात, मग 'हे' जरूर वाचा

थंडीतील ऊन चटके देणारं नसलं तरी ते त्वचेला हानी पोहोचवतंच. या उन्हातही स्किन टॅनिंग होऊ शकतं.

  • Share this:

मुंबई, 11 फेब्रुवारी : थंडीने सर्वांना हुडहुडी भरली आहे. अशा वेळी थोडं जरी ऊन दिसलं तरी शरीराला ऊब मिळावी म्हणून आपण उन्हात जातो. थंडीतल्या उन्हाने त्वचेला काही हानी पोहोचणार नाही असं वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करता का?. तर असं अजिबात नाही. बोचऱ्या थंडीतील ऊनही त्वचेसाठी घातकच आहे. थंडीतील ऊन चटके देणारं नसलं तरी ते त्वचेला हानी पोहोचवतंच. या उन्हातही स्किन टॅनिंग होऊ शकतं आणि जर वेळीच त्यावर उपाय केला नाही, तर हे स्किन टॅन कायमचं राहतं. नंतर मग हे स्किन टॅनिंग काढणं अशक्य आहे. त्यामुळे तुम्हीही थंडीत उन्हाचा आधार घेत असाल तर त्यावेळी काय काळजी घ्याल ते जाणून घेऊया.

उटणं वापरा

स्किन टॅन दूर करण्याचा घरगुती उपाय आहे तो म्हणजे उटणं लावणं. हळद, चंदन आणि बेसन याचं

उटणं तयार करा. अंघोळीच्या 15 मिनिटं आधी संपूर्ण शरीरावर उटणं लावा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे उटणं लावल्यास तुमच्या शरीरावरील टॅन निघून जाईल.

गरम पाण्याने अंघोळ

तुम्हाला थंड पाण्याने अंघोळ करण्याची सवय असेल आणि हिवाळ्यातही तुम्ही थंड पाण्याने अंघोळ करत असाल तर आता गरम पाण्याने अंघोळ करायला सुरुवात करा. गरम पाण्याने स्किन टॅनिंग लगेच दूर होते. गरम पाण्याने शरीर लवकर स्वच्छ होतं.

मॉईश्चरायझर लावा

थंडीत स्किन टॅनिंगपासून वाचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे मॉईश्चरायझर वापरणं. अंघोळीपूर्वी चेहऱ्यासह संपूर्ण शरीरावर मॉईश्चरायझर लावा. मॉईश्चराझर लावण्यासाठी वेळ नसेल, तर अंघोळीच्या गरम पाण्यात थोडंसं बॉडी ऑइल टाका.

अन्य बातम्या

सुंदर दिसण्यासाठी वारंवार फेशिअल करताय, चेहऱ्याचं सौंदर्य गमावताय

Talcum powder चा असाही करू शकता वापर; पाहाल तर म्हणाल, वाह क्या बात है !

First published: February 11, 2020, 7:39 AM IST
Tags: beauty

ताज्या बातम्या