मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Skin Care Tips : तुम्हीही मिळवू शकता सुंदर आणि ग्लोइंग स्किन, फक्त फॉलो करा या 5 सोप्या टिप्स

Skin Care Tips : तुम्हीही मिळवू शकता सुंदर आणि ग्लोइंग स्किन, फक्त फॉलो करा या 5 सोप्या टिप्स

सुंदर ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी खाण्यापिण्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. यासोबतच त्वचेची योग्य काळजीही नियमितपणे घेतली पाहिजे. तुमचा चेहरा निस्तेज, निर्जीव दिसत असेल तर या टिप्स एकदा वापरून पहा.

  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 10 ऑगस्ट : पावसाळ्यात त्वचा खूप खराब होऊ लागते. पिंपल्स, मुरूम व्यतिरिक्त त्वचेवर अनेक डाग आणि खुणा असतात, त्यामुळे त्वचेवर निस्तेजपणा येतो. जीवनशैलीच्या सवयींसोबतच त्वचेवर चमक आणण्यासाठी त्वचेच्या काळजीकडेही लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. आपण जे काही खातो आणि पितो त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो. त्यामुळे निरोगी आहार घेणेदेखील खूप महत्वाचे आहे. सकस आहार घेऊन, त्वचेची योग्य काळजी घेतल्याने तुमच्या त्वचेवर ग्लो दिसून येतो. चला जाणून घेऊया चमकदार त्वचा मिळविण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जीवनशैलीत या गोष्टींचा समावेश करा - दिवसभर पाणी पीत राहा, कारण त्वचा चांगली ठेवण्यासाठी आतून हायड्रेटेड राहणे देखील खूप महत्वाचे आहे. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील टॉक्सिन्सही निघून जातात.

इम्युनिटी वाढवण्याच्या नादात तुम्ही हळदीचे अतिसेवन तर करत नाही ना? होतील हे दुष्परिणाम

- घामामुळेही त्वचेवर एक वेगळीच चमक येते. यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो, त्यामुळे घाम काढण्यासाठी व्यायाम करा. जॉगिंग आणि डान्स करू शकतो. - साखरयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले अन्न यांचा वापर शक्यतो कमी करा. साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्यानेही त्वचेची चमक कमी होते. - भाज्या आणि रंगीबेरंगी फळे इत्यादींचे सेवन करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून शरीराला पुरेसे पौष्टिक तत्व मिळतील आणि शरीराला कशाचीही कमतरता भासणार नाही.

Tamarind Leaves Benefits : नैसर्गिकरित्या केस होतील काळे, हे आहेत चिंचेच्या पानांचे 5 आश्चर्यकारक फायदे

- योग्य प्रकारची स्किन केअर उत्पादने निवडा, जेणेकरून त्वचेला आवश्यक ते मिळेल. बाहेर जाताना, विशेषतः उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीन वगैरे नक्की वापरा. दर तीन ते चार तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावा.
First published:

Tags: Beauty tips, Lifestyle, Skin care

पुढील बातम्या