• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • स्ट्रेच मार्कमुळे घालता येत नाहीत आवडते कपडे? हे 4 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

स्ट्रेच मार्कमुळे घालता येत नाहीत आवडते कपडे? हे 4 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

पुरुषांपेक्षा महिलांना जास्त प्रमाणात स्ट्रेच मार्क होतात. नितंब, कंबर, ब्रेस्ट, अंडर आर्म या भागांमध्ये स्ट्रेच मार्कचा येतात आणि त्यामुळे आपले आवडते कपडे आपल्याला घालता येत नाहीत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : महिलाच नाही तर, पुरुषांना देखील स्ट्रेच मार्कचा त्रास (Stretch Mark Problem) होऊ शकतो. स्ट्रेच मार्क आपल्या त्वचेमध्ये (Skin) होणाऱ्या बदलामुळे होत असतात. काहीजणांना स्ट्रेच मार्क थोड्याफार प्रमाणात येतात पण, काही जणांच्या शरीरावर हे स्टेच मार्क जास्त दिसतात. खासकरून नितंब, कंबर, ब्रेस्ट, अंडर आर्म या भागांमध्ये स्ट्रेच मार्कचा त्रास होतो आणि त्यामुळे आपले आवडते कपडे आपल्याला घालता येत नाहीत. प्रत्येक वेळी कपडे घालताना आपले स्ट्रेच मार्क दिसणार तर नाहीत ना असा विचार करावा लागतो. पण, हे स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी काही उपाय करता येऊ शकतात. त्याआधी जाणून घेऊयात स्ट्रेच मार्कची कारणं स्ट्रेच मार्कची कारणं पुरुषांपेक्षा महिलांना जास्त प्रमाणात स्ट्रेच मार्क होतात. प्रेग्नेन्सीतली वेगाने वजन वाढ (Weight Gain In Pregnancy ), कार्टिकोस्टेरॉयड औषधांचा (Corticosteroid Medicine) परिणाम, ब्रेस्ट एनलार्जमेन्ट सर्जरी (Breast Enlargement Surgery), सी-सेक्शन सर्जरी (C-Section Surgery) ही महिलांमध्ये स्ट्रेच मार्क येण्याची कारणं आहेत. (वाढत्या वयानुसार का येतो थकवा? पाहा कारणं आणि उपाय) स्ट्रेच मार्क कमी करण्याची पद्धत नारळाचं तेल स्ट्रेच मार्क कमी करण्यासाठी नारळाचं तेल फायदेशीर आहे. नारळाचं तेल वापरण्यामुळे स्ट्रेच मार्कचे डाग वेगाने कमी होतात. दररोज वर्जिन कोकोनट ऑइल स्ट्रेच मार्कवर लावायला सुरुवात करा. हळूहळू डाग कमी व्हायला लागतात. पण, नारळ तेलाची अ‍ॅलर्जी असेल तर हा उपाय करू नये. (शाळा सुरू होताना बदलणार लाइफस्टाइल; आव्हानं वाढणार, करा या गोष्टींची तयारी) साखर अंडर आर्म जवळ स्ट्रेच मार्क झाले असतील तर हा उपाय करता येतो. त्यामुळे स्ट्रेच मार्कचे डाग कमी होतात. 1 चमचा साखर आणि पाव चमचा नारळ तेल किंवा बदाम तेल एकत्र करा. या मिश्रणामध्ये थोडा लिंबाचा रस टाका. या मिश्रणाने 8 ते 10 मिनिटं स्ट्रेच मार्कवर हलक्या हाताने मसाज करा आणि कोमट पाण्याने धुऊन टाका. कोरफड स्ट्रेच मार्क रिमूव्हल क्रीम पेक्षाही कोरफड वेगाने परिणाम करते. यासाठी कोरफडचा ताजा गर काढा चांगली पेस्ट तयार करून स्ट्रेच मार्कवर लावा. 20 ते 40 मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. नारळ तेल आणि एलोवेरा जेल एकत्र करूनही लावता येतं. (फक्त फळं खाल्ल्यानेही होतं युरिक ॲसिड कमी; पाहा काय खावं काय टाळावं) बटाटा त्वचेवरील कोणतेही डाग कमी करण्यासाठी बटाटा वापरता येतो. बटाट्यामध्ये ब्लिचिंग एजंट असतात. त्यामुळे डाग वेगाने कमी होतात. स्ट्रेच मार्कवर लावण्यासाठी बटाट्याचा वापर करता येतो. बटाट्याचा किस तयार करून त्याचा रस काढा. परत हा रस आणि बटाट्याचा किस एकत्र करून स्ट्रेच मार्कवर अर्धा तास लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका.
  Published by:News18 Desk
  First published: