मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Skin Care Tips - त्वचेवर नैसर्गिक तेज आणण्यासाठी उपयुक्त असते काळी वेलची, असा करा वापर

Skin Care Tips - त्वचेवर नैसर्गिक तेज आणण्यासाठी उपयुक्त असते काळी वेलची, असा करा वापर

काळ्या वेलचीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-C आणि पोटॅशियम (Black Cardamom Contains Antioxidants, Vitamin-C And Potassium) असते, जे आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. आपली त्वचा तरुण ठेवण्यासोबतच वेलची चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासही मदत करते. वाचा, त्वचेच्या सौंदर्य उपचारात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी समृद्ध असलेली काळी वेलची कशी वापरायची.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Jagtap
मुंबई, 13 ऑगस्ट : काळ्या वेलचीच्या वापरामुळे जेवणाची चव तर वाढतेच मात्र जर तुम्ही चहाचे शौकीन असाल. तर चहामधील वेलचीचा सुगंध नक्कीच तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. मसाल्याच्या भाज्यांसाठी प्रामुख्याने वापरली जाणारी ही काळी वेलची किंवा मोठी वेलची आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असते (Black Cardamom Is Rich In Ayurvedic Properties). आयुर्वेदात अनेक समस्यांवर उपाय म्हणून वेलचीचा वापर केला जातो. काळ्या वेलचीमध्ये त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी (Black Cardamom For Skin Care) अनेक प्रभावी गुणधर्म असतात. यामुळेच अनेक सौंदर्य उत्पादनांमध्येही याचा वापर केला जातो. जर तुम्ही तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये योग्य पद्धतीने वेलचीचा वापर केला तर तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होतील. यासोबतच चेहऱ्यावरील नैसर्गिक चमकदेखील वाढेल. चला जाणून घेऊया काळ्या वेलचीचे फायदे आणि ते कसे वापरावे. त्वचेसाठी काळ्या वेलचीचे फायदे काळ्या वेलचीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन-सी, पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, जे त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे (Benefits Of Black Cardamom). ते त्वचेला तरुण बनवण्यास आणि त्वचेवर दिसणारे डाग काढून टाकण्यास मदत करते. अँटी-बॅक्टेरिअल गुणांनी युक्त काळी वेलची मुरुमांच्या समस्येवरदेखील वापरली जाऊ शकते. हेही वाचा...How to burn belly fat: 'या' 5 पदार्थांमुळे कमी होते 60 टक्के भूक, पोटाची ही चरबी होते कमी वापरा काळ्या वेलचीचा फेशियल मास्क हा फेशियल मास्क तयार करण्यासाठी (Black Cardamom Facial Mask) तुम्हाला एक चमचा वेलची पावडर आणि 3 चमचे लिंबाचा रस लागेल. एका भांड्यात दोन्ही घेऊन चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटांनी चेहरा धुवा. दर आठवड्याला याचा वापर केल्याने तुम्हाला काही दिवसात फरक दिसेल. वेलचीचा त्वचेसाठी क्लींजर म्हणून करा वापर स्किन क्लींजर म्हणून वेलचीचा (Black Cardamom Is Used As Skin Cleanser) वापर करण्यासाठी एका भांड्यात 1/3 कप शेळीचे दूध घ्या आणि त्यात 1 चमचा वेलची पावडर घाला आणि हे व्यवस्थित मिक्स करून याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट हळू हळू चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा. 10 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. त्वचा स्वच्छ करण्यासोबतच ती मऊही करते. हेही वाचा...स्टेजवर जाऊन बोलण्यासाठी वाटते भीती? जाणून घ्या 'या' खास टिप्स काळ्या वेलचीचा फेस पॅक काळ्या वेलचीचा फेस पॅक बनवण्यासाठी (Black Cardamom Face Pack) एका भांड्यात 1 टीस्पून काळी वेलची पावडर आणि 1 टीस्पून दही घ्या. हे दोन्ही चांगले मिसळा. हे मिश्रण 20 मिनिटे चेहरा आणि मानेवर लावून ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा याचा वापर करा.
First published:

Tags: Home remedies, Skin care

पुढील बातम्या