नवी दिल्ली,12 जुलै : बऱ्याच मुली, महिला मेकअप करताना मस्कारा
(Mascara) वापरणं टाळतात. आपल्या डोळ्यांना सुंदर आणि ऍक्टिव्ह लूक द्यायचा असेल तर, मस्कारा लावायला हवा. मस्करा डोळ्यांबरोबरच पापण्यांना देखील एक सुंदर लूक
(Beautiful look) देतो. मस्कारा योग्य पद्धतीने लावला तर डोळ्यांचं नुकसान
(Eye Damage) होत नाही. काही टेक्निक
(Technic) वापरल्या तर आपण डेली मस्कारा वापरू शकतो. तर चला जाणून घेऊ यात आपण डेली मस्कारा लावण्यासाठी कोणत्या टिप्स
(Tips) लक्षात ठेवायला हव्यात.
डेली मस्कारा लावण्यासाठी आपल्या पापण्या नरिश्ड आणि मोश्चराईज असायला हव्यात. याकरता नारळ तेल किंवा कॅस्टर ऑईल वापरू शकता. यामुळे आपल्या पापण्यांवर प्रोटेक्टिव्ह लेयर तयार होईल. त्यामुळे जास्तवेळा मस्कारा लावलात तरी कोणतंही नुकसान होणार नाही.
(
फक्त 2 पदार्थामुळे फटाफट चरबी होईल कमी; पोटाचा घेरातही दिसून येईल परिणाम)
चांगल्या प्रतीचे प्रॉडक्ट वापरा
डोळ्यांसाठी मस्कारा खरेदी करताना स्वस्त आणि टिकाऊ घेण्यापेक्षा चांगला ब्रँडचा विकत घ्या. मस्करा खरेदी करताना ऑप्थेल्मोलॉगिकली टेस्टेड साईन जरूर चेक करा. जास्त दिवस पडून राहिलेला मस्कारा वापरू नका.
(
पुरुषांची घातली ब्रा आणि स्त्रिया टॉपलेस होऊन उतरल्या रस्त्यावर; नेमकं असं काय घ)
रिमूव्हरचा वापर
ज्या प्रकारे योग्य पद्धतीने मस्करा लावणं आवश्यक असतं तसंच तो काढणं देखील आवश्यक असतं. मस्कारा व्यवस्थित काढला नाहीतर पापण्यांचं आणि डोळ्यांचं नुकसान होतं. याकरता चांगल्या प्रतिच्या नारळ तेलाचा वापर करता येऊ शकतो.
(
जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे; कधीच लागणार नाही चष्मा)
नारळ तेलामध्ये कॉटन पॅड बुडवून काही सेकंदांसाठी आपल्या पापण्यांवरती ठेवून द्या आणि सावकाश मस्करा काढा. यानंतर फेसवॉशने आपला चेहरा स्वच्छ करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.