Home /News /lifestyle /

Skin Care Tips: हिवाळ्यात जास्त वेळ सूर्यप्रकाशात थांबणं यासाठी आहे धोकादायक, अशी घ्या त्वचेची काळजी

Skin Care Tips: हिवाळ्यात जास्त वेळ सूर्यप्रकाशात थांबणं यासाठी आहे धोकादायक, अशी घ्या त्वचेची काळजी

Skin Care Tips : सूर्याच्या किरणांमधूनही आपल्याला व्हिटॅमिन-डी मिळतं. मात्र, तरीही जास्त कडक सूर्यप्रकाश (Sunlight) आपल्या त्वचेला आणि आरोग्यास हानीकारक ठरू शकतो. म्हणूनच आपण हिवाळ्यातही जास्त वेळ कडक उन्हात (Skin Care Tips) बसू नये.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 18 जानेवारी : हिवाळ्याच्या मोसमात उन्हात बसायला कोणाला आवडत नाही? सूर्याच्या किरणांमधूनही आपल्याला व्हिटॅमिन-डी मिळतं. आपल्या दात आणि हाडांसह ते आरोग्याच्या दृष्टीनं देखील खूप फायदेशीर आहे. त्यामुळं थंडी वाजत असेल तर उन्हात बसायला हरकत नाही. उलट, आपल्यापैकी अनेकांना जवळजवळ संपूर्ण दिवस उन्हात बसून घालवण्याची इच्छा होते. परंतु आपल्याला हे माहित असले पाहिजे की जास्त कडक सूर्यप्रकाश (Sunlight) आपल्या त्वचेला आणि आरोग्यास हानीकारक ठरू शकतो. म्हणूनच आपण हिवाळ्यातही जास्त वेळ कडक उन्हात (Skin Care Tips) बसू नये. तज्ज्ञांच्या मते, दररोज किमान अर्धा तास हलका आणि सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळचा सूर्यप्रकाश शरीराला आवश्यक आहे. याच्यामुळं आपल्या शरीराची 'ड' जीवनसत्त्वाची गरज पूर्ण होते. कडक उन्हात दीर्घकाळ राहिल्यामुळं त्वचेशी संबंधित समस्यांना तोंड द्यावं लागतं. या समस्या टाळण्याचे उपाय काय आहेत, ते पाहूया. सनस्क्रीन वापरणं आवश्यक हिवाळ्यातही कडक उन्हात घराबाहेर पडताना सनस्क्रीन जरूर लावा. चेहऱ्याशिवाय हात, पाय आणि इतर उघड्या भागांवर सनस्क्रीन लावा. तसेच, सनस्क्रीनचा प्रभाव फक्त दोन-तीन तास टिकतो हे लक्षात ठेवा. त्यामुळं बराच वेळ कडक उन्हात घालवणार असाल तर ते पुन्हा-पुन्हा लावावे. सनस्क्रीन निवडताना त्याचा एसपीएफ 20 पेक्षा कमी नसावा, हेही लक्षात ठेवा. हे वाचा - Black Salt Water Benefits: विविध आजारांवर फायदेशीर आहे काळ्या मिठाचे पाणी; जाणून घ्या त्याविषयी सर्व माहिती पूर्ण बाह्यांचे कपडे घाला कोणत्याही ऋतूत कडक उन्हात घराबाहेर जाताना नेहमी पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. यामुळं बरचसं नुकसान टाळलं जातं. कडक उन्हामुळं सनबर्न होऊ शकतं, म्हणजेच तुमची त्वचा रापली जाऊ शकते किंवा त्यावर लाल पुरळ येऊ शकतात. याशिवाय, त्वचेचा तजेलदारपणा कमी होतो. त्यामुळं कडक उन्हात बाहेर जाताना किंवा शेकण्यासाठी बसताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. हे वाचा - Winter Health: थंडीत Heart Attack चा धोका वाढतोय; या चुकीच्या सवयी ताबडतोब बंद करा टोपी, गॉगल घाला कडक उन्हात सूर्याच्या हानिकारक किरणांच्या प्रभावापासून डोक्याचं आणि चेहऱ्याचं संरक्षण करण्यासाठी डोक्याला/चेहऱ्याला रुमाल बांधणं किंवा टोपी घालणं खूप प्रभावी आहे. यामुळं चेहऱ्यावर लावण्यासाठी कोणतीही कॉस्मेटिक वस्तू लावण्याची गरज नाही आणि चेहऱ्यावर थेट ऊन पडत नाही. यासोबतच, आपल्या डोळ्यांचंही रक्षण होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Skin, Skin care

    पुढील बातम्या