Home /News /lifestyle /

Avoid Pigmentation: चेहऱ्यावर सुरकत्या येणारच ना! त्यासाठी या चुका अगोदर टाळाव्या लागतील

Avoid Pigmentation: चेहऱ्यावर सुरकत्या येणारच ना! त्यासाठी या चुका अगोदर टाळाव्या लागतील

Skin Care Tips To Avoid Pigmentation : पिगमेंटेशनची समस्या बर्‍याच प्रमाणात टाळता येऊ शकते. जाणून घेऊया त्याविषयीच्या टिप्सबद्दल, ज्यांच्या मदतीनं तुम्ही सुरकुत्या आणि त्वचेवर ठिपके येण्याची समस्या सहज घालवू शकता.

    नवी दिल्ली, 22 जानेवारी : आपल्या सर्वांनाच सुंदर आणि डागरहित त्वचा हवी असते, पण सध्याच्या प्रदूषणानं भरलेल्या वातावरणात आणि धकाधकीच्या जीवनशैलीत आपण आपल्या त्वचेच्या काळजीबाबत बेफिकीर राहतो. त्यामुळं आपल्या त्वचेविषयी अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. यापैकी एक म्हणजे त्वचेवरील पिगमेंटेशनची (त्वचेतील रंगद्रव्य ठिपक्यांच्या किंवा डागांच्या स्वरूपात दिसणं) समस्या. याचं कारण प्रदूषणाव्यतिरिक्त सौंदर्यप्रसाधनांचा वापर, कडक उन्हामुळं त्वचा रापणं किंवा पोटाशी संबंधित समस्या किंवा इतर काहीही असू शकतं. त्यामुळं चेहऱ्यावर काळे डाग पडू लागतात. यामुळं त्वचा (Skin Care Tips To Avoid Pigmentation) कुरूप दिसू लागते. अशा काही सवयी आहेत, ज्याचा अवलंब केल्यास पिगमेंटेशनची समस्या बर्‍याच प्रमाणात टाळता येऊ शकते. जाणून घेऊ अशाच काही टिप्सबद्दल, ज्यांच्या मदतीनं तुम्ही सुरकुत्या आणि त्वचेवर ठिपके येण्याची समस्या सहज टाळू शकता. पिगमेंटेशन टाळण्यासाठी टिप्स (Tips to avoid pigmentation) निकोटीनचा वापर कमी करा निकोटीन आपल्या त्वचेचं अनेक प्रकारे नुकसान करतं. म्हणूनच आपण धूम्रपानासारख्या सवयी सोडल्या पाहिजेत. निकोटीनमुळं शरीराची जीवनसत्त्वं, अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्त्वांची गरज वाढते. म्हणजेच त्यांचा प्रभाव कमी होतो. यामुळं आपली त्वचा अकाली वृद्ध दिसू लागते. तसंच, निकोटीनमुळे त्वचेवर काळे डाग आणि चट्टे दिसू लागतात. त्यामुळं त्वचेवर सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांचा प्रभावही वाढतो. म्हणून, सुरकुत्या आणि त्वचेवर ठिपके येण्याची समस्या टाळण्यासाठी, निकोटीन असलेल्या गोष्टी पूर्णपणे सोडून द्या किंवा त्यांचा कमीतकमी वापरा. थेट आणि कडक उन्हापासून त्वचेचं रक्षण करा कडक उन्हाच्या दीर्घ संपर्कात आल्यामुळं त्वचेचं मोठं नुकसान होतं. विशेषत: पिगमेंटेशन म्हणजेच त्वचेवर ठिपके किंवा काळे डाग येण्याच्या समस्येत यामुळं भर पडते. कारण कडक उन्हाच्या प्रभावामुळं त्वचेमध्ये असणारं मेलॅनिन हे रंगद्रव्य अधिक प्रमाणात जमा होऊ लागतं. यांच्यामुळे त्वचा काळसर होण्यासोबतच त्वचेवर ठिपके किंवा डाग दिसू शकतात. कडक उन्हामुळं त्वचेवर ब्लॅकहेड्स देखील दिसू लागतात. (हे वाचा - चुकीची माहिती पसरवणारे 42 Social Media Handles मोदी सरकारने केले Block, पाकिस्तानातून पसरवत होते भारतद्वेष) याच्यामुळं त्वचेचा टोन आणखी बिघडतो. याशिवाय, सूर्याच्या धोकादायक अतिनील किरणांचा (ultraviolate rays) त्वचेवर परिणाम होऊन त्वचा रापू शकते किंवा भाजल्यासारखीही होऊ शकते. त्यामुळं त्वचेच्या पिगमेंटेशनसारख्या समस्या टाळण्यासाठी, जास्त वेळ उन्हात राहू नका. जर तुम्हाला कडक उन्हात बाहेर जावं लागत असेल, तर त्वचेवर चांगलं सनस्क्रीन लावायला विसरू नका. त्वचेवर चुकीची सौंदर्य प्रसाधनं वापरू नका अनेकदा आपण जाहिरातबाजीच्या प्रभावाखाली किंवा इतरांच्या सल्ल्यानं चुकीची सौंदर्य-उत्पादनं निवडतो. त्यामुळं त्वचेवर ऍलर्जी किंवा काळेपणा येणं सुरू होतं. खरं तर स्वतःच्या त्वचेनुसार स्वतःसाठी सौंदर्य उत्पादनं घेणं योग्य ठरतं. यासाठी कोणतंही कॉस्मेटिक खरेदी करताना त्याची पॅच-टेस्ट करणं चांगले. म्हणजेच, खरेदी करताना, तळहाताच्या मागील बाजूस ते सौंदर्यप्रसाधन त्वचेवर थोडेसं लावून पहावं आणि कोणत्याही प्रकारची जळजळ किंवा अ‌ॅलर्जी होत नाही ना, हे पहावं. त्वचेवर सुरक्षित असेल तरच ती सौंदर्य-उत्पादनं खरेदी करा. यामुळं त्वचेच्या इतर अनेक समस्यांसोबत पिगमेंटेशन होणार नाहीत. जास्त काळ उष्ण वातावरणात राहू नका कडक उन्हाळ्याच्या वातावरणात त्वचा रापते हे आपल्याला माहीत आहे. याशिवाय, उष्ण वातावरणात त्वचेत मेलॅनिन हे रंगद्रव्य अधिक प्रमाणात तयार होतं. हे पिगमेंटेशनचं मुख्य कारण आहे. त्यामुळं त्वचेच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू नयेत म्हणून आपण जास्त काळ उष्ण वातावरणात राहू नये. परफ्यूम स्प्रे वापर परफ्यूम कधीही थेट त्वचेवर वापरू नयेत. त्यात विविध प्रकारची रसायनं असतात, ज्यामुळं अॅलर्जी होऊ शकते. परफ्यूम थेट त्वचेवर वापरल्यानंही त्वचा काळी पडते. विशेषतः चेहऱ्याच्या अतिसंवेदनशील त्वचेसाठी ही बाब अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळं, त्वचेवर ठिपके येणं आणि इतर समस्या टाळण्यासाठी परफ्यूम थेट त्वचेवर वापरू नका.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Skin, Skin care

    पुढील बातम्या