मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Skin Care Tips : थोड्याशा तुपाने त्वचा होईल सुंदर आणि ग्लोइंग, फक्त अशा पद्धतीने करा वापर

Skin Care Tips : थोड्याशा तुपाने त्वचा होईल सुंदर आणि ग्लोइंग, फक्त अशा पद्धतीने करा वापर

सुंदर त्वचेसाठी वापरा तूप

सुंदर त्वचेसाठी वापरा तूप

निरोगी जीवनशैलीचा आनंद घेणारे बरेच लोक त्यांचे अन्न चवदार बनवण्यासाठी तूप वापरतात. त्याचबरोबर त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी तुपाचा वापरही खूप प्रभावी आहे.

    मुंबई, 20 ऑगस्ट : चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी लोक बर्‍याचदा बेस्ट स्किन केअर रुटीन फॉलो करतात. तसेच त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यासाठी बहुतेक लोकांना घरगुती उपाय वापरणे आवडते. तुपाचा वापर हादेखील त्यापैकीच एक आहे. पण तुम्हाला माहित आहे का की तुपात काही गोष्टी मिसळणे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. याच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत त्वचेवर ग्लो आणू शकता. खरं तर, पोषक तत्वांनी समृद्ध तूप सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर त्वचेची काळजी घेण्यासाठी तुपाचा वापर त्वचेवर खूप प्रभावी ठरू शकतो. तसेच तुपामध्ये काही नैसर्गिक गोष्टी टाकून त्वचेसाठी अधिक गुणकारी बनवता येते. चला तर मग जाणून घेऊया त्वचेची काळजी घेण्यासाठी तुपाचा वापर आणि त्याचे काही फायदे. तूप आणि हळद तूप आणि हळदीचा फेस पॅक त्वचेसाठी सर्वोत्तम घरगुती उपाय ठरू शकतो. ते बनवण्यासाठी १ चमचे हळद २ चमचे तूप मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावून हलक्या हातांनी मसाज करा आणि 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. तूप आणि हळदीचे फायदे अत्यावश्यक फॅटी ऍसिडस् समृध्द तुपाचा वापर कोरड्या त्वचेपासून सुटका करून त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम करतो. तसेच स्किन केअरमध्ये तूप वापरल्याने त्वचा मुलायम आणि हायड्रेट राहते. दुसरीकडे हळद, जी अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे, मुरुम, डाग, फ्रिकल्स, काळी वर्तुळे आणि पिगमेंटेशनपासून मुक्त होवून त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यास मदत करते. तूप- बेसन फेस पॅक लावा तूप आणि हळदीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी तुम्ही त्वचेच्या काळजीमध्ये तुपाचा फेसपॅक देखील वापरून पाहू शकता. ते बनवण्यासाठी भांड्यात 2 चमचे तूप, 2 चमचे बेसन आणि 1 चिमूट हळद घालून नीट मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून तीनदा तुपाचा फेस पॅक लावा. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर दिसेल.
    Published by:Pooja Jagtap
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Skin care

    पुढील बातम्या