मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Summer Skin Care: उन्हाळ्यातील सर्व स्कीन प्रॉब्लेम्स होतील गायब; हे 4 घरगुती फेसपॅक वापरून पाहा

Summer Skin Care: उन्हाळ्यातील सर्व स्कीन प्रॉब्लेम्स होतील गायब; हे 4 घरगुती फेसपॅक वापरून पाहा

उन्हाळ्यात थंडावा देणारे घरगुती फेस पॅक (cooling homemade face pack) वापरलात तर तुमच्या त्वचेच्या इतरही अनेक समस्या कमी होतील आणि त्यात असलेल्या नैसर्गिक कूलिंग इफेक्टमुळे तुमची त्वचाही थंड राहण्यास मदत होईल.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 02 जून : उन्हाळ्यात ऊन आणि धुळीमुळे चेहऱ्यावर जळजळ, खाज सुटणे, पुरळ उठणे अशा समस्यांनी लोक त्रस्त झाले आहेत. हा त्रास कमी करण्यासाठी लोक एकतर पाण्याने चेहरा धुतात किंवा काही प्रकारचे लोशन वापरतात किंवा कधी कधी चेहऱ्यावर बर्फ चोळल्यानेही खूप आराम मिळतो. पण अनेक वेळा इतकं करूनही ही समस्या बरी होत नाही आणि त्वचेवर जळजळ आणि कोरडेपणा जाणवतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही नैसर्गिक गोष्टींचा वापर केलात किंवा उन्हाळ्यात थंडावा देणारे घरगुती फेस पॅक (cooling homemade face pack) वापरलात तर तुमच्या त्वचेच्या इतरही अनेक समस्या कमी होतील आणि त्यात असलेल्या नैसर्गिक कूलिंग इफेक्टमुळे तुमची त्वचाही थंड होईल. जाणून घेऊया कोणत्या गोष्टींचा वापर करून आपण त्वचेचे प्रॉब्लेम्स कमी (Summer Skin Care) करू शकतो. कूलिंग इफेक्टसाठी हे फेस पॅक - काकडीचा फेस पॅक - काकडीचा फेस पॅक तुमची त्वचा जलद हायड्रेट करतो, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि फ्रेश दिसते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर पुरळ उठत असतील तर त्यावर उपाय करण्यासाठी काकडी किसून त्याचा रस काढा. त्यात 1 चमचे कोरफड जेल घाला आणि संपूर्ण चेहरा आणि प्रभावित त्वचेवर लावा. 20-25 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा, तुम्हाला आराम वाटेल. बटाट्याचा फेस पॅक - चेहऱ्यावर थंडावा आणण्यासाठी बटाट्याचा फेस पॅकही खूप फायदेशीर आहे. यासाठी प्रथम बटाटा बारीक करून त्याचा रस काढा आणि त्यात थोडे कच्चे दूध मिसळा आणि कापसाच्या मदतीने प्रभावित त्वचेवर लावा. 15 मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचेला थंडावा तर मिळेलच शिवाय त्वचेवरील डागही कमी होतील. हे वाचा - विवाहित पुरुषांनी यासाठी मनुके खायला हवेत; आरोग्याला असा होतो फायदा चंदनाचा फेस पॅक - चंदनामध्ये कूलिंग इफेक्ट असतो, जो त्वचेवर थंडावा आणण्यासाठी म्हणून वर्षानुवर्षे वापरला जात आहे. त्याचा फेस पॅक बनवण्यासाठी 1 चमचा चंदन पावडर घ्या आणि त्यात 1 चमचा गुलाबजल मिसळा. तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हे वाचा - Type 2 Diabetes असेल तर या 4 प्रकारची हिरवी पानं चावून खा; दिसेल चांगला परिणाम टरबूज फेस पॅक टरबूजचा फेस पॅक तुमच्या त्वचेला हायड्रेट करतो आणि थंडपणा आणतो. टरबूजचा फेस पॅक बनवण्यासाठी ते चांगले मॅश करून चेहऱ्यावर आणि मानेला लावा. आपण 20 मिनिटांनंतर ते धुवू शकता. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Skin, Skin care, Summer

पुढील बातम्या