मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Skin Care: चेहऱ्यावरील स्ट्रेच मार्क्स, डार्क सर्कल्सवर रामबाण उपाय आहे स्वयंपाक घरातील ही डाळ

Skin Care: चेहऱ्यावरील स्ट्रेच मार्क्स, डार्क सर्कल्सवर रामबाण उपाय आहे स्वयंपाक घरातील ही डाळ

आयुर्वेदानुसार, कुळीतमध्ये बुरशीनाशक, बॅक्टेरियाविरोधी आणि तुरट गुणधर्म असतात. कुळीत डाळ फायबरचा एक उत्तम स्रोत आहे जी आतड्यांसंबंधी हालचाल सुलभ करण्यात मदत करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. यामुळे त्वचेला होणाऱ्या फायद्यांबद्दल माहिती (Skin Care) घेऊया.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण इतके व्यग्र झालो आहोत की, आपण स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही. त्यामुळे निद्रानाश, जास्त कामाचा त्रास, व्यायामाचा अभाव, तणाव यांसारख्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे, वजनात चढ-उतार आणि निस्तेज त्वचा, स्ट्रेच मार्क्स अशा समस्या नॉर्मल बनल्या आहेत. फक्त महिलाच नव्हे तर पुरुषही या समस्यांना बळी पडत आहेत. मात्र, याबाबत घाबरण्याची गरज नाही. कारण यावर उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. आपण बोलतोय कुळीत किंवा horse gram विषयी. या शेंगाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात भरपूर पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात. आयुर्वेदानुसार, कुळीतमध्ये बुरशीनाशक, बॅक्टेरियाविरोधी आणि तुरट गुणधर्म असतात. कुळीत डाळ फायबरचा एक उत्तम स्रोत आहे जी आतड्यांसंबंधी हालचाल सुलभ करण्यात मदत करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. यामुळे त्वचेला होणाऱ्या फायद्यांबद्दल माहिती (Skin Care) घेऊया.

चमकणारी त्वचा, सुरकुत्या, टोन्ड बॉडी आणि मुलायम त्वचेसाठी कुळीत डाळीचा वापर खूप फायदेशीर आहे. त्यापासून बनवलेला ब्युटी मास्क वापरून तुम्ही फरक पाहू शकता.

हे करण्यासाठी, तुम्हाला 2 चमचे कुळीत डाळ पावडर, 1 चमचा दही आणि चिमूटभर हळद घालावी लागेल. हे सर्व मिक्स करून चेहऱ्यावर आणि मानेला लावा आणि 15 मिनिटे राहू द्या. जेव्हा हा मास्क सुकतो, तेव्हा तुमची बोटे ओली करा आणि तुमचा चेहरा हलका घासून घ्या जेणेकरून मास्क स्क्रब म्हणून वापरता येईल. त्यानंतर कोमट पाण्याने चांगले धुवा. यानंतर चेहऱ्यावर ओलावा टिकवून ठेवण्यासाठी टोनर लावा. तुम्ही हा पॅक स्ट्रेच मार्क्स एरियावरही वापरू शकता. त्याचा परिणाम तुम्हाला तिथेही दिसेल.

हे वाचा - OMG! DJ च्या आवाजामुळे कोंबड्यांना आला Heart attack; 63 Chickens दगावल्या

फेस पॅकचे फायदे

हा फेस पॅक तुम्हाला आठवड्यातून दोनदा वापरावा लागेल. याच्या मदतीने तुम्हाला मऊ त्वचा मिळेल, त्वचेच्या मृत पेशींपासून सुटका मिळेल, चमकणारी त्वचा, आय बॅग्ज कमी होतील, वृद्धत्वविरोधी संरक्षण मिळेल, मुरुमे कमी होण्यासही मदत होते.

हे वाचा - Alert! कोरोनानंतर भारतात पहिल्यांदाच Drug resistant Fungus चा शिरकाव; दोघांचा मृत्यू

प्रतिकारशक्ती वाढते

तुमच्या आहारात कुळीतच्या डाळीचा समावेश करा, त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढेल. कारण ताप, सामान्य सर्दी, दमा आणि ब्राँकायटिस यांवर उपचार आणि हे आजार टाळण्याकरता कुळीत उत्कृष्ट मानले जाते. त्यामुळे श्वास घेणेही सोपे होते.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Health Tips, Skin care