मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्याचे अनेक उपाय ठरलेत कुचकामी; मग ही गोष्टी करून पहाच

चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्याचे अनेक उपाय ठरलेत कुचकामी; मग ही गोष्टी करून पहाच

 पिंपल्स हे सहसा आपल्या खाण्याच्या सवयी आणि हार्मोनल बदलांमुळे होतात. चेहऱ्यावर अचानक मुरुमे येऊ लागली असतील तर तुम्ही त्यांना एका रात्रीत बरे करू शकता. यासाठी तुम्ही अॅक्ने आणि पिंपल पॅच (Patch) वापरू शकता. हा पॅच तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये (Remove Pimple In One Night) सहज मिळेल.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 नोव्हेंबर : मुरुमे किंवा पिंपल्स ही आपल्या चेहऱ्याच्या त्वचेची सर्वात मोठी समस्या आहे. त्यांचा केवळ आपल्या सौंदर्यावरच परिणाम होत नाही तर त्यामुळे होणाऱ्या वेदनाही सहन कराव्या लागतात. पिंपल्सची समस्या ही आपल्या त्वचेच्या आरोग्यावर अवलंबून असते. त्वचेचे योग्य प्रकारे डिटॉक्सिंग होत असेल तर ही समस्या होण्यापासून रोखली जाऊ शकते. पिंपल्स हे सहसा आपल्या खाण्याच्या सवयी आणि हार्मोनल बदलांमुळे होतात. चेहऱ्यावर अचानक मुरुमे येऊ लागली असतील तर तुम्ही त्यांना एका रात्रीत बरे करू शकता. यासाठी तुम्ही अॅक्ने आणि पिंपल पॅच (Patch) वापरू शकता. हा पॅच तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये (Remove Pimple In One Night) सहज मिळेल.

पॅच कसा वापरावा

मुरुमे घालवण्यासाठी रात्रीच्या वेळी आपला चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा आणि त्याला मॉइश्चरायझर लावा. आता हा पॅच चेहऱ्यावरील प्रभावित भागावर लावा. सकाळी उठल्यावर ते धुवून टाका. तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त आराम वाटेल आणि त्वचाही स्वच्छ दिसेल. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. जर मुरुमे खूप जाड, लाल, वेदनादायक असतील तर ते बरे होण्यासाठी एका रात्रीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

हे वाचा - IT क्षेत्रात येणार ‘ही’ कंपनी घालणार धुमाकूळ! तब्बल 1 लाख फ्रेशर्सना 2022 पर्यंत देणार Jobs; वाचा काय आहे प्लॅन

पस झालेल्या मुरुमांवरही फायदेशीर

तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल पूर्णपणे पिकला असेल म्हणजेच त्यामध्ये पससारखे दिसत असेल तरीही तुम्ही हा पॅच वापरू शकता. आपण ब्लिस्टर पट्टी देखील वापरू शकता. हे उपाय पू (पस) बाहेर काढून तुमचे पिंपल लवकर सुकवते.

हे वाचा - राज्यात लोकांचा निष्काळजीपणा, 92.5 लाख लोकांनी घेतला नाही Corona लसीचा दुसरा डोस

असा होतो फायदा

हे पॅच बनवण्यासाठी सॅलिसिलिक अॅसिड, बेंझॉयल पेरोक्साइड, अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड, टी ट्री ऑइलचा वापर केला जातो. परंतु, हा पॅच फक्त रात्रीच वापरावा. तसेच ज्या रात्री तुम्ही हे लावता त्याच्या दुसऱ्या दिवशी उन्हात जाणे शक्यतो टाळावे किंवा जाण्याची वेळ आल्यास सनस्क्रीनचा वापर करावा.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Beauty tips, Skin care