मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Onion Skin Care Hacks: महाग झाला असला तरी कांद्याचे आहेत खूप फायदे; जेवणातच नाही तर केस आणि स्किनसाठीही होतो वापर

Onion Skin Care Hacks: महाग झाला असला तरी कांद्याचे आहेत खूप फायदे; जेवणातच नाही तर केस आणि स्किनसाठीही होतो वापर

Onion Skin Care Hacks : चेहऱ्याची त्वचाही चमकदार आणि तेजस्वी बनवण्यासाठी कांद्याचा उपयोग केला जात आहे.

Onion Skin Care Hacks : चेहऱ्याची त्वचाही चमकदार आणि तेजस्वी बनवण्यासाठी कांद्याचा उपयोग केला जात आहे.

Onion Skin Care Hacks : चेहऱ्याची त्वचाही चमकदार आणि तेजस्वी बनवण्यासाठी कांद्याचा उपयोग केला जात आहे.

    नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : स्वयंपाक घरात बहुपयोगी असलेला कांदा (Onion) आता सौंदर्य खुलवण्याच्या कामातही येत आहे. अलिकडे केस मजबूत करण्यासाठी त्याचा वापर खूप लोकप्रिय होत आहे. कांद्याचा वापर केल्यानं केस अधिक मजबूत होतात आणि केसांना चांगली चमक येते. चेहऱ्याची त्वचाही चमकदार आणि तेजस्वी बनवण्यासाठी कांद्याचा उपयोग केला जात आहे. कांद्यामध्ये एक विशेष एंजाइम असते, जे चेहऱ्याच्या त्वचेला मऊ आणि मुलायम बनवते, तर त्वचेसाठी त्याचा वापर केल्याने त्वचा चमकदार बनते. तर आज चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी कांदा कसा उपयोगी (Onion Skin Care Hacks) आहे, याविषयी जाणून घेऊया. केसच नव्हे तर चेहऱ्याच्या सौंदर्यासाठीही कांद्याचे आहेत खूप फायदे; असा करा वापर कांदा ब्यूटी हॅक्स 1. चमकदार त्वचेसाठी जर तुम्ही कोरड्या, रुक्ष त्वचेने त्रस्त असाल तर तुम्ही फेस मास्क बनवून कांदा वापरू शकता. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि चेहरा उजळतो. त्याच्या वापर करून चेहऱ्यावरील डागदेखील काढले जाऊ शकतात. या कृतीसाठी आपल्याला 3 चमचे दही आणि एक छोटा कांदा आवश्यक आहे. हे वाचा - 6 महिन्यांपासून पोटात होता मोबाईल; युवकाला कल्पनाही नव्हती, एक्सरे पाहून डॉक्टरही शॉक 2. कांद्याच फेस मास्क कसा बनवायचा सर्वप्रथम कांदा बारीक करून त्याची पेस्ट बनवा. आता कांद्याच्या पेस्टमध्ये 3 चमचे दही घालून चेहऱ्यावर फेस मास्क म्हणून लावा. 15 मिनिटांनंतर ते धुवा. आपण हे आठवड्यातून एक दिवस करू शकता. 3. पुरळांसाठी उपयोगी जर तुम्हाला मुरुमांचा त्रास होत असेल तर मुरुमे कमी करण्यासाठी चेहऱ्यावर कांद्याचा पॅक लावा. तो तयार करण्यासाठी 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मध आणि एक कांदा आवश्यक आहे. कांद्याची पेस्ट बनवा आणि त्यात 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचे मध घाला. आता ते फेटा आणि आपल्या चेहऱ्यावरील आवश्यक भागात लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हे वाचा - VIDEO : 3000 मृतदेहांचे शवविच्छेदन केलेल्या डॉक्टरांचा असा झाला धक्कादायक मृत्यू; नाचता-नाचताच घडलं असं 4. ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी कांद्याच्या मदतीने तुमचे काळे ओठ गुलाबी होऊ शकतात. याशिवाय ते मऊ आणि चमकदार देखील होऊ शकतात. यासाठी कांद्याच्या रसात व्हिटॅमिन ई तेल मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावा. तुम्ही हे रोज केल्यास एका महिन्यानंतर तुमच्या ओठांच्या रंगातील बदल तुम्हाला दिसून येईल. (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Onion, Skin care

    पुढील बातम्या