मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

या चित्रात लपलेत 6 प्राणी; बिरबलसारखी बुद्धी असणारेही देऊ शकणार नाही उत्तर, पाहा तुम्हाला जमतय का

या चित्रात लपलेत 6 प्राणी; बिरबलसारखी बुद्धी असणारेही देऊ शकणार नाही उत्तर, पाहा तुम्हाला जमतय का

बुद्धिमान युजर्स या प्रश्नाचं अचूक उत्तर देत प्राणी नेमकेपणानं शोधत आहेत. तुम्हीही बघा प्रयत्न करून.

बुद्धिमान युजर्स या प्रश्नाचं अचूक उत्तर देत प्राणी नेमकेपणानं शोधत आहेत. तुम्हीही बघा प्रयत्न करून.

बुद्धिमान युजर्स या प्रश्नाचं अचूक उत्तर देत प्राणी नेमकेपणानं शोधत आहेत. तुम्हीही बघा प्रयत्न करून.

नवी दिल्ली, 6 मे : इंटरनेटवर (Internet) रोज अनेक फोटोज, व्हिडिओज किंवा कंटेंट व्हायरल (Viral) होत असतो. अनेक युजर्स अशा गोष्टी शेअरदेखील करत असतात. अलीकडे ऑप्टिकल इल्युजन (Optical illusion) हा एक नवा प्रकार इंटरनेटवर खूप लोकप्रिय होत आहे. ऑप्टिकल इल्युजन हा डोळ्यांपुढे काहीसा संभ्रम निर्माण करणारा प्रकार असतो. ऑप्टिकल इल्युजन असणारे फोटो, चित्र (Painting) इंटरनेटवर शेअर केली जातात.

अशा चित्रांमध्ये किंवा फोटोंमध्ये किती आणि कोणते प्राणी आहेत, कोणत्या आकृती आहेत आदी प्रश्न विचारले जातात. यामुळे युजर्स अशा चित्रांकडे नकळत आकर्षित होतात आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. खरं तर विचारांना चालना देण्यासाठी अशी चित्र डिझाईन केली जातात. त्यामुळे चित्रांमधलं रहस्य उलगडून सांगताना मजा येते. सध्या असंच एक ऑप्टिकल इल्युजन असलेलं चित्र समोर आलं आहे. या चित्रात सहा प्राणी लपलेले असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे प्राणी शोधताना युजर्सच्या बुद्धी आणि नजरेचा कस लागताना दिसत आहे. `इंडिया डॉट कॉम`ने या विषयीची माहिती दिली आहे.

इंटरनेटवर ऑप्टिकल इल्युजन असलेल्या चित्रांच्या सीरिज पाहायला मिळतात. सध्या असंच एक रहस्यमय (Mysterious) चित्र इंटरनेटवर पाहायला मिळत आहे. या चित्रात सहा प्राणी लपलेले असून ते कोणते आहेत, असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र या चित्रात कोणते प्राणी आहेत हे सांगणं अनेक युजर्सना अवघड जात आहे. काही उत्साही युजर्स बारकाईनं चित्र पाहून उत्तर देण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहेत. पण बहुतांश युजर्सची उत्तरं पूर्ण बरोबर येतातच असं नाही.

हे ही वाचा-Vastu: घरामध्ये घड्याळ लावताना या चुका करू नका; दिशा चुकली तर अनेक गोष्टी बिघडतात

खरं तर या चित्रात डाव्या बाजूला असलेल्या झाडाकडे निरखून पाहिलं तर त्याची फांदी मगरीसारखी दिसेल. झाडाच्या उजव्या बाजूला एक फुलपाखरू आहे. टेकडीकडे अगदी लक्षपूर्वक पाहिल्यास उंट दिसतील. फुलपाखराजवळ कोब्रा लपला असल्याचं दिसेल. उजवीकडे झाडाजवळ हरिण दिसेल. झाडाच्या पानांमध्ये ससा लपून बसलेला दिसेल. या फोटोच्या अनुषंगाने विचारण्यात आलेल्या प्रश्नांची ही उत्तरं असली तरी हे प्राणी शोधण्यात बहुतांश युजर्स अपयशी ठरत आहेत. ही गोष्ट लक्षात घेत, चित्राच्या अनुषंगाने काही हिंट (Hint) देण्यात आल्या आहेत.

या चित्रात मगर, उंट, फुलपाखरू, कोब्रा साप, हरिण आणि ससा लपला असल्याचं सांगितलं आहे. पण चित्रातल्या ऑप्टिकल इल्युजनमुळे हे प्राणी सहजासहजी नजरेस पडत नसल्याचं यूजर्सच्या उत्तरांवरून दिसत आहे.

त्यातही बुद्धिमान युजर्स या प्रश्नाचं अचूक उत्तर देत प्राणी नेमकेपणानं शोधत आहेत. तुम्हीही बघा प्रयत्न करून.

First published:

Tags: Other animal, Viral