• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • टॉयलेट सीटवर 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसत असाल तर हे वाचा.. सवय आरोग्यासाठी धोकादायक!

टॉयलेट सीटवर 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसत असाल तर हे वाचा.. सवय आरोग्यासाठी धोकादायक!

काही जण तर अक्षरशः अर्धा-अर्धा तास टॉयलेट सीटवर बसून राहतात. तुम्ही अशांपैकी एक असाल तर काळजी घ्या. तज्ज्ञ काय सांगत आहेत वाचा....

  • Share this:
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: जगात आज अशा अनेक व्यक्ती आहेत, की ज्या टॉयलेट सीटवर आरामात बसून (Toilet) मोबाइल वापरतात. काही जण तर अक्षरशः अर्धा-अर्धा तास टॉयलेट सीटवर बसून राहतात. तुम्ही अशांपैकी एक असाल तर काळजी घ्या. यूकेतल्या `एनएचएस`मधल्या एका डॉक्टरनी त्यांच्या टिकटॉक अकाउंटवर (TikTok Account) याचे दुष्परिणाम दर्शवणारा एक व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. कोणी टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसून राहत असेल, तर त्यातून आरोग्यविषयक समस्यांना आमंत्रण दिलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. डॉ. राजन यांच्या म्हणण्यानुसार, `ज्या व्यक्ती 10 मिनिटांपेक्षा अधिक काळ टॉयलेट सीटवर बसून राहतात, ते त्यांचं आरोग्य धोक्यात घालत आहेत. अशा व्यक्तींमध्ये मूळव्याधीची (Piles) समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. या आजाराला Hemorrhoids असंही म्हटलं जातं. या आजारात मांसाचा एक तुकडा गुदद्वाराजवळून बाहेर येतो आणि यामुळे खूप वेदना होतात. 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसावं लागत असेल, तर त्याचा अर्थ असा की संबंधित व्यक्तीचं पोट साफ नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसून प्रेशर द्यावं लागतं आणि त्या जागी असलेल्या ऊतींचं (Tissue) नुकसान होतं.` पुरेशी झोप न घेतल्यास होऊ शकतात `हे` गंभीर आजार; आयुष्य होईल 12 टक्क्यांनी कमी डॉ. राजन यांनी सांगितलं, की `प्रत्येक व्यक्तीच्या गुदद्वारावर एक पडदा असतो. हा पडदा एखाद्या व्यक्तीला अवेळी शौचास जाण्यापासून रोखतो. जेव्हा तुम्ही अधिक काळ टॉयलेट सीटवर बसून राहता, तेव्हा या पडद्यावर ताण येतो, त्यामुळे तो पंक्चर होतो. यामुळे गुदद्वारातून रक्तस्रावदेखील होऊ शकतो. त्यामुळे 10 मिनिटांपेक्षा अधिक वेळ टॉयलेट सीटवर बसणं टाळलं पाहिजे. जितका जास्त वेळ तुम्ही टॉयलेट सीटवर बसून राहाल तितकं तुमच्या रक्त वाहिन्यांचं (Blood Vessels) अधिक नुकसान होईल.` ब्रा आणि पँटीवर का असतो 'रिबन बो? जाणून घ्या त्यामागील खरं कारण डॉ. राजन यांनी लोकांना या समस्येवर उपायदेखील सांगितला आहे. ते म्हणाले, की `असा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात (Diet) फायबरयुक्त पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करावा. यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल. जेव्हा तुमचं पोट साफ राहील तेव्हा तुम्हाला जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसून राहण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला 10 मिनिटांपेक्षा अधिक वेळ टॉयलेट सीटवर बसण्याची सवय लागली, तर ती तुमच्यासाठी घातक ठरू शकते. प्रसंगी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. त्यामुळे पोट साफ कसे राहील, याकडे तुम्ही अधिक लक्ष देणं आवश्यक आहे,` असं डॉ. राजन यांनी सांगितलं.
First published: