VIDEO सिंगापूरच्या विमानतळावर मजेशीर सोय; बोर्डिंग करण्यासाठी उतरावी लागेल ही घसरगुंडी

ही सोय कोणत्याही प्रकारची गाडी किंवा ट्रॉली नाहीये तर, ती आहे एक भली मोठ्ठी घसरगुंडी जी प्रवाशाला थेट बोर्डिंग गेटपर्यंत नेऊन सोडते. आहे की नाही मजेशीर?

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 06:25 AM IST

VIDEO सिंगापूरच्या विमानतळावर मजेशीर सोय; बोर्डिंग करण्यासाठी उतरावी लागेल ही घसरगुंडी

मुंबई, 11 जुलैः जगातल्या सर्वात चांगल्या विमानतळांपैकी एक आहे, सिंगापूरचं चांगी विमानतळ. या प्रशस्त विमानतळावर एक नवीनच सोय करण्यात आली आहे. या विमानतळावर प्रवाशांसाठी एक मजेशीर गोष्ट आहे. ती गंमत पाहिल्यावर तुम्हालाही तिथे जाण्याचा मोह आवरणार नाही. प्रवाशांना बोर्डिंग गेटपर्यंत थेट सोडण्याची ही सोय आहे. आश्चर्य म्हणजे ही सोय कोणत्याही प्रकारची गाडी किंवा ट्रॉली नाहीये तर, ती आहे एक भली मोठ्ठी घसरगुंडी जी प्रवाशाला थेट बोर्डिंग गेटपर्यंत नेऊन सोडते. आहे की नाही मजेशीर?

Airtel चा 'हा' सर्वात स्वस्त प्लान काय आहे घ्या जाणून!

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, युसुफ अल अस्कसाय नामक प्रवाशाला चांगी विमानतळावर जाण्याचा योग आला. त्याने राईडचा व्हिडीओदेखील चित्रीत केला. या व्हिडीओमध्ये युसुफ त्या गोलाकार घसरगुंडीमधून जातो आणि थेट चांगीच्या प्रसिद्ध red chandelier ला येऊन पोहोचतो. या प्रसिद्ध red chandelier 2018 ला अनावरण करण्यात आलं होतं.

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तातडीने सोडा ही सवय

 Cater News Agency ने युसुफच्या या अनुभवाविषयी विचारलं तेव्हा तो म्हणाला, याआधी मी अशाप्रकारची सोय कोणत्याही विमानतळावर पाहिली नाही. मला यावर विश्वास बसत नव्हता पण, आता स्वतः अनुभव घेतल्यावर हे खर आहे याची जाणीव होत आहे. चांगी विमानतळाच्या टर्मिनल 4 वर ही घसरगुंडी आहे तर टर्मिनल 3 वर त्याहुनही मोठी घसरगुंडी पाहायला मिळते. इनसाईडरच्या एका लेखामध्ये अशी माहिती दिली आहे की, ही घसरगुंडी 12 मीटर म्हणजे जवळपास, 39 फिट एवढी लांब आहे. पण, या मजेशीर राईडचा आनंद घेण्यासाठी प्रवाशाला पैसे मोजावे लागतात.

Loading...

=======================================================

राज ठाकरेंना आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचा विरोध आहे का? अशोक चव्हाण म्हणतात...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 06:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...