मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Happy Life : तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचेय? मग या सोप्या गोष्टींचा अवलंब करून पाहा

Happy Life : तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचेय? मग या सोप्या गोष्टींचा अवलंब करून पाहा

आनंदी असणे आरोग्यासाठी चांगले आहे, परंतु आपल्यापैकी किती लोक खरोखर आनंदी आहेत? बहुतेक लोक त्यांच्या समस्यांबद्दल चिंतित आहेत. कोरोना (Corona) काळात तर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर तणाव दिसून येत होता.

आनंदी असणे आरोग्यासाठी चांगले आहे, परंतु आपल्यापैकी किती लोक खरोखर आनंदी आहेत? बहुतेक लोक त्यांच्या समस्यांबद्दल चिंतित आहेत. कोरोना (Corona) काळात तर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर तणाव दिसून येत होता.

आनंदी असणे आरोग्यासाठी चांगले आहे, परंतु आपल्यापैकी किती लोक खरोखर आनंदी आहेत? बहुतेक लोक त्यांच्या समस्यांबद्दल चिंतित आहेत. कोरोना (Corona) काळात तर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर तणाव दिसून येत होता.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : आनंदी राहणं हे जीवनातील सर्वात मोठं यश आहे. ज्यानं आयुष्यात आनंदी कसं राहायचं हे जाणलं, त्यानं खरंच आयुष्य जगलं असं म्हणता (simple ways to become happy person) येईल. परंतु, आनंदी जीवनदेखील इतके सहजासहजी मिळत नाही. प्रत्येकाला माहीत आहे की, आनंदी असणे आरोग्यासाठी चांगले आहे, परंतु आपल्यापैकी किती लोक खरोखर आनंदी आहेत? बहुतेक लोक त्यांच्या समस्यांबद्दल चिंतित आहेत. कोरोना (Corona) काळात तर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर तणाव दिसून येत होता. एक प्रकारे, कोरोनानं जगभरातून आनंद हिरावून घेतला. आनंदी असण्याचा आणि निराश असण्याचा आरोग्याशी थेट संबंध आहे.

TOI च्या बातमीनुसार, जर आपण आनंदी राहिलो (become happy) तर आरोग्य चांगले राहते, त्याउलट आपण दुःखी राहिलो तर तब्येत बिघडू लागते. आपण आपल्या आत जितकी नकारात्मक ऊर्जा भरतो, तेवढा कोर्टिसोल हार्मोनचा प्रभाव वाढतो आणि आपण दुःखी राहू लागतो. पण, जर आपण सकारात्मक विचार करून आनंदी राहत असाल तर डोपामाइन हार्मोन आपल्या शरीरात स्त्रवत राहतं. डोपामाइनला आनंदी संप्रेरक देखील म्हणतात. म्हणूनच आनंदी राहणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर या सोप्या गोष्टींचा अवलंब करा.

व्यायाम किंवा डान्स :

व्यायाम आणि डान्स करणे यामध्ये काय अधिक फायदेशी आहे, याबद्दल गोंधळ घालण्यापेक्षा आपण आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर तुम्ही व्यायाम केला तर तुमच्या शरीरातून एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे तुम्हाला आनंदी वाटते. जर तुम्हाला व्यायाम करता येत नसेल तर तुम्ही त्याऐवजी डान्स करू शकता. डान्स करण्यासाठी, आपण डान्स क्लासेस घेऊ शकता किंवा आपण इंटरनेटची मदत घेऊ शकता. म्हणजेच व्यायाम आणि नृत्य दोन्ही चांगले आहेत.

योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करा : आपले लक्ष योग्य गोष्टींवर केंद्रित करा. तुम्ही आयुष्यात जे काही काम करणार आहात ते पूर्ण समर्पणाने करा. आपल्याकडे जे आहे त्यात आनंदी रहा.

हे वाचा - पाकिस्तानची पुन्हा फजिती! न्यूझीलंड, इंग्लंडनंतर आणखी एका देशाचा क्रिकेट दौरा रद्द

आवडीची गोष्ट करिअर म्हणून निवडा : आपल्याला जात आवड आहे, असे काम करिअर म्हणून निवडा. आपले आवडीचे काम करत राहिल्याने कंटाळा येत नाही. उलट त्यात नव-नवीन कल्पना सूचत जातात आणि आपण अधिक आनंदी राहतो. तुम्हाला काय करायचे आहे ते तुम्हीच ठरवा. जर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काम केले तर तुम्ही पुढे जाल आणि तुम्हीही आनंदी व्हाल.

संगीत ऐका (music): तुमच्या आवडीनुसार संगीत ऐका. संगीत तुम्हाला सकारात्मक ठेवते. जर तुम्हाला काही शो बघायचे असतील तर ते सुद्धा सकारात्मकपणे बघा.

हे वाचा - Petrol Price Today: आजही महागलं इंधन, मुंबईकरांना 1 लीटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 109 रुपये

चांगल्या लोकांच्या सहवासात रहा : चांगल्या लोकांच्या सहवासात असणे खूप महत्वाचे आहे. चांगले लोक म्हणजे नकारात्मकता नसलेले लोक. आनंदी होण्यासाठी नकारात्मक विचारसरणीच्या लोकांपासून अंतर ठेवणे खूप महत्वाचे आहे. ज्यांची विचारसरणी सकारात्मक आहे, अशा लोकांसोबत राहिलात तरच तुम्ही आनंदी होऊ शकता.

First published:

Tags: Lifestyle