मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Simple Tricks : घरातली स्टीलची गंजलेली भांडी अशी करा स्वच्छ!

Simple Tricks : घरातली स्टीलची गंजलेली भांडी अशी करा स्वच्छ!

घरामध्ये स्टील, अॅल्युमिनियम, तांबं आणि प्लास्टिकची भांडी प्राधान्यानं वापरली जातात. यातल्या काही भांड्यांचा वापर दररोज होतोच असं नाही. त्यामुळे स्टीलची भांडी (Steel Utensils) गंजू शकतात.

घरामध्ये स्टील, अॅल्युमिनियम, तांबं आणि प्लास्टिकची भांडी प्राधान्यानं वापरली जातात. यातल्या काही भांड्यांचा वापर दररोज होतोच असं नाही. त्यामुळे स्टीलची भांडी (Steel Utensils) गंजू शकतात.

घरामध्ये स्टील, अॅल्युमिनियम, तांबं आणि प्लास्टिकची भांडी प्राधान्यानं वापरली जातात. यातल्या काही भांड्यांचा वापर दररोज होतोच असं नाही. त्यामुळे स्टीलची भांडी (Steel Utensils) गंजू शकतात.

  मुंबई, 9 सप्टेंबर : घरामध्ये स्टील, अॅल्युमिनियम, तांबं आणि प्लास्टिकची भांडी प्राधान्यानं वापरली जातात. यातल्या काही भांड्यांचा वापर दररोज होतोच असं नाही. त्यामुळे स्टीलची भांडी (Steel Utensils) गंजू शकतात. अशी भांडी जुनी झाल्यावर ती फेकून दिली जातात. कारण स्टीलची भांडी गंजल्यावर ती तुटतात. परंतु, अशा काही घरगुती पद्धती आहेत, की ज्याद्वारे गंजलेली स्टीलची भांडी स्वच्छ करून ती पुन्हा वापरू शकता.

  घरात बऱ्याच वर्षांपासून वापराविना काही भांडी पडून असतात. पडून राहिल्याने या भांड्यांवर गंज चढतो आणि ती खराब होऊ लागतात. अशी खराब झालेली भांडी तुटू लागतात आणि मग ती फेकून दिली जातात. परंतु, अशी गंज (Rust) लागलेली स्टीलची भांडी फेकून देण्याची अजिबात गरज नाही. कारण काही घरगुती उपायांचा अवलंब करून ती भांडी स्वच्छ करून पुन्हा वापरता येऊ शकतात.

  स्टीलची भांडी गंजून खराब झाली असतील तर अशा भांड्यांना बेकिंग सोडा (Baking Soda) लावावा. तसंच कापसाच्या एका बोळ्यावर अॅपल सिडर व्हिनेगर (Vinegar) स्प्रे फवारावा आणि या कापसाच्या बोळ्यानं भांडं घासावं. भांडं घासताना त्यावर पुन्हा अॅपल सिडर व्हिनेगर फवारावं. 10 मिनिटांनंतर भांडं पाण्यानं धुवावं.

  स्टीलच्या, तसंच अन्य भांड्यांवरील गंज काढून टाकण्यासाठी तुम्ही मीठ (Salt) आणि लिंबाचा (Lemon) वापर करू शकता. एका भांड्यात 2 चमचे मीठ घ्यावं आणि ते लिंबाच्या तुकड्यांवर लावावं. गंज लागलेली भांडी या लिंबाच्या तुकड्यानं घासावीत. काही मिनिटांतच भांड्यांवरचा गंज निघून गेल्याचं दिसेल. त्यानंतर पाण्याखाली ही भांडी स्वच्छ धुऊन घ्यावीत.

  अनेकदा भांडी जास्त काळ वापराविना पडून राहिली तर त्यावर गंज चढतो. त्यामुळे स्टीलची भांडी धुतल्यानंतर लगेच ट्रॉलीत ठेवू नयेत. कारण असं केल्यानं त्यावर गंज चढू शकतो.

  भांड्यांवरचा गंज काढण्यासाठी इनोमध्ये (Eno) लिंबाचा रस टाकावा आणि टूथब्रशने हे मिश्रण भांड्यावर जिथे गंज लागला आहे तिथं लावावं. त्यानंतर 10 मिनिटं भांडं तसंच ठेवावं. 10 मिनिटांनंतर वाळूमिश्रित कागदानं भांडं घासून स्वच्छ करावं.

  या अत्यंत सोप्या घरगुती पद्धतींचा वापर करून तुम्ही गंजलेली भांडी स्वच्छ करू शकता आणि ती पुन्हा वापरू शकता. घरातली स्टीलची भांडी दीर्घ काळ टिकावीत यासाठी ती धुतल्यावर लगेचच ट्रॉलीत ठेवून न देता, पूर्ण कोरडी होईपर्यंत बाहेरच ठेवावीत.

  Keywords :

  First published: