ऑफिसमध्ये बसून येते पायांना सूज? मग, करुन पाहा हे 3 सोपे उपाय!

सतत एका जागी बसून पायांना सूज येते आणि पाय दुखायला सुरुवात होते. यावर उपाय म्हणून अनेक जण खुर्चीवरच मांडी घालून बसतात. पण, ऑफिसमध्ये अशाप्रकारे सतत बसणं योग्य नाही. त्याऐवजी हे सोपे उपाय करून पाहा...

  • Share this:

पाय लटकून बसल्यावर सूज येण्याची अनेकांची तक्रार असते. खासकरून ऑफिसमध्ये खुर्चीवर सतत बसून पायाला सूज येते. तासनतास एका जागेवर बसून पायाला येणाऱ्या सूजेवर आता तुम्ही घरबसल्या उपाय करू शकता.

खूर्चीवर जास्त वेळ बसल्याने सूज येत असल्यास, ठराविक वेळेने पायांना वर करावे आणि गोलाकार फिरवावेत. त्याने पाय मोकळे होतील आणि सूज येणार नाही.

सतत एका जागी बसून पायांना सूज येते आणि ते दुखायला सुरुवात होते. पाय दुखण्याची इतरही कारणे आहेत. अनेकजण खुर्चीवरच मांडी घालून बसतात. पण, ऑफिसमध्ये अशा प्रकारे बसणं शक्य होत नाही. पाय ठेवायला काही तरी घ्यावे आणि थोडे उंचावर पाय ठेवावे.

काही ठराविक वेळेनंतर न विसरता पायांची हालचाल चालू ठेवा. पायांना वर-खाली करत त्यांचा व्यायाम करा. त्यामुळे पायांमधील रक्तप्रवाह सुरळीत होऊन सूज येणार नाही. शिवाय पायांना आरामही मिळेल.

रक्त गोठल्यामुळे किंवा रक्तप्रवाह मंद झाल्यामुळे पाय सुजतात. या आजाराला डिप वेन थ्रोमबोसिस असं म्हणतात. त्यामुळे सतत बसणे टाळावे आणि कामामधून वेळ काढून पाय मोकळे करण्यासाठी चालायला जावे. याशिवाय खुर्चीवर बसताना पाय हवेत न ठेवता जमिनीवर टेकवावे.

खुर्चीवर बसताना शक्यतो ताठ बसावे. वाकून बसल्याने पाठदुखीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. मानेलासुद्धा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. याकरिता तुमचा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप डोळ्याच्या समोर असणं गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 08:47 AM IST

ताज्या बातम्या