Home /News /lifestyle /

Kitchen Hacks : काही केल्या रव्यामध्ये किडे होतातच ना? मग या सोप्या उपायांनी स्वच्छ करा

Kitchen Hacks : काही केल्या रव्यामध्ये किडे होतातच ना? मग या सोप्या उपायांनी स्वच्छ करा

रवा फेकण्याऐवजी त्याचे किडे काढून तो पुन्हा वापरता येतो. यासाठी तुम्हाला बाजारातून काही वेगळं आणण्याची गरज नाही. काही घरगुती उपाय आहेत, ज्याच्या मदतीने रव्यातील किडे काढून तो पुन्हा वापरता येतो.

    मुंबई, 29 डिसेंबर : आपल्या किचनमध्ये (Kitchen Hacks) अशा अनेक गोष्टी असतात, ज्या व्यवस्थित न ठेवल्यास खराब होऊ शकतात. कोणतीही वस्तू दीर्घकाळ न वापरल्याने अनेकदा त्या खराब होऊ लागतात. काही खाद्यपदार्थांमध्ये किडे होऊ लागतात त्यामुळे आपले नुकसान होते. विशेषत: रव्याबद्दल बोलूया, अनेकांच्या घरात रवा (sooji) लवकर खराब होतो. त्यामध्ये कीडे-अळ्या होऊ लागतात. त्यामुळे रवा एकतर स्वयंपाकघरातून फेकून दिला जातो किंवा प्राण्यांना खायला घातला जातो. रवा कितीही व्यवस्थित साठवून ठेवला तरी त्यात किडे किंवा जाळ्या होतात. अशा स्थितीत महिला खराब रवा फेकून देण्यास (Useful Kitchen Tips) प्राधान्य देतात. रवा फेकण्याऐवजी त्याचे किडे काढून तो पुन्हा वापरता येतो. यासाठी तुम्हाला बाजारातून काही वेगळं आणण्याची गरज नाही. काही घरगुती उपाय आहेत, ज्याच्या मदतीने रव्यातील किडे काढून तो पुन्हा वापरता येतो. सूर्यप्रकाश रव्यात पांढरे कृमी आढळल्यास प्रथम गाळून नंतर रवा उन्हात ठेवावा. चाळणीतच अनेक किडे वेगळे केले तरी रवा उन्हात ठेवल्यावर उरलेले किडे बाहेर पडतात. आणखी एक गोष्ट, रवा उन्हात ठेवल्यानंतर मध्ये-मध्ये हाताने ढवळत राहा, त्यामुळे उरलेले किडे पळून जातील. उन्हात ठेवल्यावरनंतरही रवा पुन्हा चाळून घ्या. हे वाचा - Thyroid Medication: थायरॉईडची औषधं तुम्हीही घेताय? मग या गोष्टी सर्वात अगोदर जाणून घ्या कडुलिंबाची पाने हवाबंद डब्यात रवा ठेवल्यानंतरही किडे होऊ नयेत म्हणून त्यात कडुलिंबाची पाने ठेवणे चांगले. कडुलिंबाच्या पानांमध्ये ओलावा राहणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. डब्यात 10 ते 12 कडुलिंबाची पाने ठेवा आणि रव्याचे किड्यांपासून संरक्षण करा. कापूर रव्यातील किडे काढून टाकण्यासाठी कापराचीही मदत घेऊ शकता. यासाठी आधी रवा चाळून घ्या आणि मग तो वर्तमानपत्रावर पसरवा. आता कापूरचे तुकडे वर्तमानपत्रावर ठेवा. कापूरच्या वासाने किडे पळून जातील. हे वाचा - Aquarius Personality: दूरदर्शी आणि चांगला नेता बनते कुंभ राशीची व्यक्ती; वाचा त्यांची ही 10 वैशिष्ट्ये घट्ट झाकण रवा ठेवण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची टीप मानली जाते. रवा अशा कंटेनरमध्ये (डब्यामध्ये) ठेवावा, ज्यामध्ये हवा अजिबात जात नाही. काचेच्या एअर टाईट बॉक्समध्ये रवा ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच रव्याचा डबा ठेवताना डब्यात ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे रव्यामध्ये किडे होणार नाहीत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Food, Lifestyle

    पुढील बातम्या