व्हायरल तापापासून वाचण्यासाठी हे 4 घरगुती उपाय करून पाहा, मिळेल लगेच आराम

व्हायरल तापापासून वाचण्यासाठी हे 4 घरगुती उपाय करून पाहा, मिळेल लगेच आराम

तापाबरोबर घसा दुखणं, खोकला, डोकेदुखी, सांधेदुखीसह उलट्या आणि अतिसार सुरू झाला तर दुर्लक्ष करू नका...

  • Share this:

मुंबई : पावसाळ्यात Viral infection मुळे आलेल्या तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडतात. या तापाबरोबरच सर्दी, खोकला, अंगदुखीसारखे आजारही अनेकांना होतात. या तापात रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे इतरही आजारांची लागण लवकर होऊ शकते. व्हायरल तापाची लक्षणं कोणती आणि त्यावर काही घरगुती उपाय आहेत का याविषयी...

व्हायरल तापाची लक्षणं

व्हायरल तापाची काही विशिष्ट लक्षणं शरीरात दिसून येतात. यात घसा दुखणं, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, सांधेदुखी,स उलट्या आणि अतिसार सुरू होतो. याशिवाय डोळे लाल होऊन डोकं गरम व्हायला सुरुवात होते.

निसर्गोपचार कधीही उत्तम  व्हायरल  तापावर तातडीने उपचार सुरू करायला हवेत. वैद्यकीय सल्ला तर घ्यावाच. पण त्या जोडीला काही घरगुती उपचार करून पाहता येतील. योग्य आहारातून तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. यामुळे तापही लवकर बरा होऊ शकतो. ताप 102 किंवा त्याहून कमी असेल तर घरगुती उपचार करूनही ताप कमी करता येऊ शकतो. रुग्णाच्या शरीरावर, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. जोवर शरीराचं तापमान कमी होत नाही तोवर  हे सुरू ठेवावं.  दर सहा तासांनंतर पॅरासिटेमॉलची (क्रोसीन किंवा तत्सम कुठलीही जेनेरिक गोळी) एक गोळी द्यावी. तरीही ताप उतरला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तुळशीचा काढा - एक चमचा लवंगांची पावडर 20 ताज्या आणि स्वच्छ केलेल्या तुळशीच्या पानांबरोबर एक लीटर पाण्यात टाकून उकळा. दर दोन तासांनी हा काढा प्यायला द्या. यामुळे शरीरातील सर्व बॅक्टेरिया, कीटाणू आणि अन्य विषाणू नष्ट होतात. व्हायरल तापासाठी तुळशीचा काढा हा सर्वोत्तम मानला जातो.

धण्याची चहा- धण्यात असलेले अँटिबायोटिक तत्त्व विषाणूंविरोधात लढण्याची शक्ती देतात. धण्याच्या बिया शरीराला विटामीन देतात. पाण्यात एक मोठा चमचा भरून धणे उकळा. यानंतर यात थोडं दूध आणि साखर मिसळा.

लिंबू आणि मध- लिंबाचा रस आणि मध व्हायरल ताप कमी करतं. घशाची खवखव थांबते. शिवाय उलट्या -जुलाबांपासून आराम मिळू शकतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे नवरंगी वर्तुळ, औरंगाबादेतला मनमोहक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 08:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading