Home /News /lifestyle /

कपड्यांवरील मेकअपचे डाग घालवण्यासाठी करून पाहा हे काही घरगुती उपाय

कपड्यांवरील मेकअपचे डाग घालवण्यासाठी करून पाहा हे काही घरगुती उपाय

कुठे कार्यक्रमाला गेलं की, घाईघाईत चांगल्या कपड्यांवर डाग लागतातच. हे काही घरगुती उपाय नक्की करून पाहा.

    मुंबई, 25 जून: बऱ्याचदा आपण लग्न समारंभ (weddings), पार्टी (party) किंवा बाहेर कुठेतरी फिरायला जाण्यासाठी आवरत असतो. अशा वेळी घाईगडबडीत मेकअप (make up) करताना ब्युटी प्रॉडक्ट्स (beauty products) आपल्या कपड्यांना लागतात आणि मेकअप प्रॉडक्ट्सचे कपड्यांवर दिसेल असे डाग पडतात. मेकअपचे कपड्यांवरील डाग काढण्यासाठी (How to remove makeup stains from clothes) काही घरगुती उपाय (home remedies) आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात काय आहेत हे उपाय. शेविंग क्रीम – कपड्यांवरील मेकअपचे डाग घालवण्यासाठी तुम्ही शेविंग क्रीम (shaving cream) वापरू शकता. थोडंसं शेविंग क्रीम कपड्यावरील डागांवर लावून पाच मिनिटे राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने कपडे धुऊन घ्या. ब्लो ड्रायरचा वापर – ड्राय मेकअप प्रॉडक्टमुळे (dry make up products) लागलेले डाग कपड्यांवरून घालवण्यासाठी तुम्ही ब्लो ड्रायरचा (blow dryer ) वापर करू शकता. ब्लो ड्रायर ऑन करून जिथे कपड्यांवर डाग लागलाय तिथे वापरा. अगदी काही मिनिटात कपड्यांवरील डाग निघून जाईल. हेअर स्प्रेचा वापर – तुमच्या कपड्यांवर लिक्विड मेकअप (liquid make up) किंवा लिपस्टिकचा (lipstick) डाग लागला असेल तर तो डाग घालवण्यासाठी हेअर स्प्रे (hair spray) वापरू शकता. Weight Loss कमी करण्याचा सोपा उपाय; फक्त सकाळच्या काही सवयी बदला तुम्ही थोडासा हेअर स्प्रे घ्या आणि डागांवर लावा. त्यानंतर ते कपडे दहा मिनिटे तसेच राहू द्या. थोड्या वेळाने साध्या पाण्याने ते कपडे धुऊन घ्या. आईस क्यूबचा वापर – आईस क्यूबचा (ice cube) वापर करून देखील तुम्ही कपड्यांवरील मेकअपचे डाग घालवू शकता. एक आईस क्यूब घ्या आणि ते कपड्यांवरील डागांवर दहा मिनिटं ठेवून द्या. त्यानंतर हलक्या हाताने कपडे रब करा आणि साध्या पाण्याने धुऊन घ्या. फेशियल वाईपचा वापर- मेकअप प्रॉडक्ट्सचे डाग लवकर घालवण्यासाठी तुम्ही फेशियल वाइप (facial wipe) वापरू शकता. फेशियल वाइप मेकअपच्या डागावर हलक्या हाताने घासा. मेकअप प्रॉडक्ट फेशियल वाइप वर दिसायला लागला की दुसरा फेशियल वाइप वापरा. अशाप्रकारे जोपर्यंत मेकअपचा डाग निघत नाही, तोपर्यंत तुम्ही फेशियल वाईपचा वापर करू शकता. ‘Black Food’चा फायदा माहिती आहे का?;आजच खायला सुरूवात करा मेकअपचा डाग लागलेले तुमचे काही कपडे असतील तर वर दिलेल्या काही पद्धती वापरून तुम्ही तुमच्या कपड्यांवर लागलेले मेकअपचे डाग अगदी सहज घालवू शकता.
    First published:

    Tags: Home remedies

    पुढील बातम्या