मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सततच्या डोकेदुखीकडे करू नका दुर्लक्ष; ब्रेन ट्युमरची ‘ही’ सायलेंट लक्षणं वेळीच ओळखा

सततच्या डोकेदुखीकडे करू नका दुर्लक्ष; ब्रेन ट्युमरची ‘ही’ सायलेंट लक्षणं वेळीच ओळखा

ब्रेन ट्युमर (Brain Tumor) होण्यामागे अनेकदा आनुवंशिक कारणंही असू असतात. डोकेदुखी (Headache) हे ब्रेन ट्युमरचं मुख्य लक्षण आहे. या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

ब्रेन ट्युमर (Brain Tumor) होण्यामागे अनेकदा आनुवंशिक कारणंही असू असतात. डोकेदुखी (Headache) हे ब्रेन ट्युमरचं मुख्य लक्षण आहे. या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

ब्रेन ट्युमर (Brain Tumor) होण्यामागे अनेकदा आनुवंशिक कारणंही असू असतात. डोकेदुखी (Headache) हे ब्रेन ट्युमरचं मुख्य लक्षण आहे. या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

मुंबई 13 ऑगस्ट : ब्रेन ट्युमर (Brain Tumour) हा आजार अनेकांना झाल्याचं अलीकडे ऐकायला मिळतं. ब्रेन ट्युमरची (Brain Tumour) नेमकी कारणं काय आहेत हे समजणं तसं अवघड आहे; पण ब्रेन ट्युमर होण्यामागे अनेकदा आनुवंशिक कारणंही असू असतात. डोकेदुखी (Headache) हे ब्रेन ट्युमरचं मुख्य लक्षण आहे. या लक्षणांबद्दल जाणून घेऊया. फुटबॉल किंवा बास्केटबॉलसारखे खेळ खेळताना जोरात पडल्याने डोक्याला गंभीर मार लागतो. काहीवेळा असं पडल्यानंतर रक्तस्राव होत नाही; पण रक्तस्राव न होणं जास्त धोकादायक असतं. कारण त्यामुळे ब्रेन ट्युमरची शक्यता वाढते. CT स्कॅनच्या माध्यमातूनच याचं निदान होऊ शकतं. अनेकदा खेळताना पडल्यानंतर रक्त आलं नाही तर CT स्कॅन (CT Scan) करायचं टाळलं जातं, पण असं करू नये. ब्रेन ट्युमरची सर्वसामान्य लक्षणं जाणून घेऊया. अनेकदा ही लक्षणं आपल्या लक्षातच येत नाहीत. बऱ्याचदा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अगदी अ‍ॅडव्हान्स्ड स्टेजमध्ये गेल्यावरच ब्रेन ट्युमरचं (Advanced Stage Of Brain Tummour) निदान होतं, पण दुर्दैवाने तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. Diabetes : डायबेटीसच्या रुग्णांनी 2 जेवणांमध्ये किती अंतर ठेवावं? ब्रेन ट्युमरची लक्षणं सायलेंट म्हणजेच पटकन कळून न येणारी असतात. या सायलेंट लक्षणांबद्दल माहिती करून घेणं आवश्यक आहे. कारण ती लक्षात आली, तर ब्रेन ट्युमरच्या सुरुवातीच्या स्टेजमध्येच त्याचं निदान होतं. यामुळे त्यावर वेळेवर उपचार करणं मग सोपं जातं, असं नवी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समध्ये न्यूरॉलॉजीचे सीनिअर कन्सल्टंट म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. पी. एन. रंजन यांनी सांगितलं. भारतात दिव्यांग्यांच्या एकूण संख्येपैकी 3.2 टक्के जणांच्या व्यंगामागे ब्रेन कॅन्सर हेच कारण असल्याचं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. तसंच 1 लाख पुरुष आणि महिलांमध्ये मज्जासंस्थेच्या (Nervous System) कॅन्सरचे दरवर्षी 6.3 टक्के नवे रुग्ण आढळत असल्याचंही या अभ्यासातून समोर आलं आहे. ट्युमर होण्याची कारणं ब्रेन ट्युमर होण्यामागची ठोस कारणं समजणं तसं अवघड आहे. यामागे अनेकदा आनुवंशिकता हे कारण असू शकतं. उदाहरणार्थ, काहीवेळा एखाद्या व्यक्तीच्या जीनोममुळे शरीरात काही पेशींची निर्मिती खूप जास्त होते किंवा धोकादायक किरणात्सोराच्या संपर्कात आल्यानेही असं होऊ शकतं. Toothache Home Remedy : दातदुखीने त्रस्त आहात? हे आहेत दातदुखीवर रामबाण उपाय ब्रेन ट्युमरची काही लक्षणं सायलेंट, पण गंभीर असू शकतात. डोकेदुखी : सतत होणारी डोकेदुखी हे ब्रेन ट्युमरचं एक सर्वसामान्य लक्षण आहे. अशी डोकेदुखी सतत होत असली तरी ती ब्रेन ट्युमरमुळेच होते की अन्य कोणत्या गोष्टींमुळे याचं निदान करणं हे डॉक्टरांसाठीही अनेकदा अवघड असतं. किरकोळ दृष्टिदोष ब्रेन ट्युमरच्या सुरुवातीच्या काळात व्यक्तीच्या दृष्टीवर परिणाम होतो. त्यामुळे धूसर दिसणं किंवा दृष्टिदोष निर्माण होऊ शकतात. बोलताना अडखळणं स्पीच सेंटरमध्ये जो ट्युमर असतो त्यामुळे काहीवेळा काही वस्तूंची नावं घेणं अवघड होतं किंवा ती व्यक्ती काय बोलत आहे हे समजणंही अवघड होतं. अशक्तपणा आणि सुस्ती यामुळे मेंदूच्या (ब्रेन) मोटार कॉर्टेक्समध्ये शरीरातल्या स्नायूंच्या हालचालींवर परिणाम होतो. स्वभावात बदल ट्युमरमध्ये अनेकदा जळजळ होते. त्यामुळे फ्रंटल लोब (डोक्याच्या पुढच्या भागात) जळजळ आणि दुखणं सुरू होतं. याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. संतुलन कमी होणं ब्रेन ट्युमरवर सर्जरी, रेडिओथेरपी किंवा केमोथेरपीच्या माध्यमातून उपचार होऊ शकतात. “सहसा ब्रेन ट्युमरचं निदान झालं की सर्जरी हा पहिला पर्याय असतो. कधीकधी ट्युमर ब्रेनमध्ये अशा ठिकाणी असतो की सर्जरी करूनही तो काढता येत नाही. अशा वेळी रुग्णाला केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीचा सल्ला दिला जातो. यामुळे ट्युमर छोटा करणं किंवा काढून टाकणं शक्य होतं,” असं डॉ. रंजन यांनी सांगितलं.
First published:

Tags: Brain, Health Tips

पुढील बातम्या