मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Tea And Weight Gain : चहा प्यायल्याने खरंच वजन वाढतं का? तज्ज्ञांनी सांगितलं यामागील तथ्य

Tea And Weight Gain : चहा प्यायल्याने खरंच वजन वाढतं का? तज्ज्ञांनी सांगितलं यामागील तथ्य

1-खूप गरम चहा पिणं
खूप गरम चहा प्यायला आवडत असेल तर तुम्हाला तुमची ही सवय बदलण्याची गरज आहे. फार गरम चहा प्यायल्याने तोंडात फोड-अल्सरचा त्रास होऊ शकतो. शिवाय गरम चहा घशातून गिळताना अन्न नलिकेचे नुकसान होते. त्यामुळे असं करणं टाळा.

1-खूप गरम चहा पिणं खूप गरम चहा प्यायला आवडत असेल तर तुम्हाला तुमची ही सवय बदलण्याची गरज आहे. फार गरम चहा प्यायल्याने तोंडात फोड-अल्सरचा त्रास होऊ शकतो. शिवाय गरम चहा घशातून गिळताना अन्न नलिकेचे नुकसान होते. त्यामुळे असं करणं टाळा.

हल्ली लोक आपल्या आरोग्याविषयी खूप जागरूक झाले आहेत. म्हणून जेव्हा आपण हेल्दी इटिंगकडे वळतो तेव्हा चहा आपल्यासाठी किती सुरक्षित आहे? याने आपले वजन वाढते का? हे प्रश्न पहिल्यांदा आपल्याला पडतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 07 नोव्हेंबर : जगातील अब्जावधी लोकांचा दिवस चहाने सुरू होतो. बहुतेक लोकांना दुधाचा चहा आवडतो, तर काही लोक ग्रीन टी पितात. शतकानुशतके पारंपारिक औषधांमध्ये चहाचा वापर केला जात आहे. चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र चहा एका मर्यादेतच पिणे योग्य असते. जर तुम्ही दिवसातून 3-4 कप किंवा त्याहून अधिक चहा पीत असाल तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

हल्ली लोक आपल्या आरोग्याविषयी खूप जागरूक झाले आहेत. म्हणून जेव्हा आपण हेल्दी इटिंगकडे वळतो तेव्हा चहा आपल्यासाठी किती सुरक्षित आहे? याने आपले वजन वाढते का? हे प्रश्न पहिल्यांदा आपल्याला पडतात. वेट लॉस कोच डॉक्टर स्नेहल आडसुळे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिली आहे. चहा प्यायल्याने खरंच आपले वजन वाढते का? जाणून घेऊया याचे उत्तर.

चहा पिताना नकळत होणाऱ्या या 5 चुका अन्ननलिका खराब करतात

स्नेहल आडसुळे यांच्या मते, दिवसातील एक कप चहाने फारसा फरक करत नाही. मात्र ज्यांना चहा प्त्यायला आवडतो. अशा लोंकांचे एक कप चहाने मन भारत नाही. जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर तुम्हाला हे कळेल की 3-4 कप चाय भारतीयांसाठी सामान्य बाब आहे.

‘चहा’ मध्ये फॅटनिंग म्हणजेच वजन वाढवणारा असा कोणताही घटक नाही. खरे तर चहा योग्य पद्धतीने घेतल्यास आरोग्यासाठी चांगला असतो. पण चहाचे आपल्याला शरीरावर काय परिणाम होणार हे चहा बनवण्याची पद्धत आणि त्यासोबत आपण काय खातो यावर अवलंबून असते.

Kuhlad Chai Benefits : फक्त टेस्टीच नाही तर हेल्दीही असतो कुल्हड चहा; पाहा काय आहेत फायदे

क्लासिक रेग्युलर चहामध्ये जास्त चरबीयुक्त दूध आणि साखर असते. चहाच्या सरासरी कपमध्ये 120-150 कॅलरीज असतात. या प्रमाणानुसार दिवसातून 3-5 वेळा चहा प्यायल्यास निश्चितच येऊ तुमचे वजन कमी होण्यास मदत करत नाही. त्यामुळे चहाचे प्रमाण हळूहळू कमी करा. आपला चहा स्वतः बनवा आणि चहा बनवण्याचा आरोग्यदायी मार्ग वापरून पाहा.

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार तुम्ही तुमच्या आहारात साखर कमी प्रमाणात किंवा अधूनमधून घालू शकता. तुम्ही गूळदेखील वापरू शकता, परंतु वजन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून दोन्हीमध्ये जवळजवळ समान कॅलरीज आहेत. मात्र तुम्हाला प्रक्रिया केलेली साखर नको असेल तर त्याऐवजी गूळ वापरणे चांगले. जर तुम्हाला गोड चवीशी तडजोड करायची नसेल तर एकूण चहाचे सेवन कमी करा. थोडेसे बदल करून तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलात तरीही चहाचा आनंद घेऊ शकता.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Tea, Weight, Weight loss tips