• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • वेदना शमतील पण होतील भयंकर परिणाम; गरोदरपणात Paracetamol का घेऊ नये वाचा

वेदना शमतील पण होतील भयंकर परिणाम; गरोदरपणात Paracetamol का घेऊ नये वाचा

फोटो सौजन्य - AFP Relaxnews/ mediaphotos/ Istock.com

फोटो सौजन्य - AFP Relaxnews/ mediaphotos/ Istock.com

प्रेग्न्सीत काही औषधं घेणं महिलांनी टाळावं, असा सल्ला डॉक्टर्स वारंवार देत असतात.

  • Share this:
मुंबई, 25 सप्टेंबर : महिलांसाठी गर्भधारणेचा (Pregnancy) कालावधी अधिक संवेदनशील असतो. या कालावधीत महिलांमध्ये अनेक प्रकारचे मानसिक आणि शारीरिक बदल होत असतात. त्यामुळे या काळात महिलांची अधिक काळजी घेतली जाते. गर्भवती महिलांचा आहारविहार आणि औषधांवरही विशेष लक्ष केंद्रीत केलं जातं. गर्भधारणेच्या कालावधीत काही औषधं घेणं महिलांनी टाळावं, असा सल्ला डॉक्टर्स वारंवार देत असतात. याच अनुषंगाने पॅरासिटामोल (Paracetamol) हे वेदनाशामक (Pain killer) औषध कायम चर्चेत असतं. काही तज्ज्ञांच्या मते गर्भधारणेच्या कालावधीत पॅरासिटामोल घेणं घातक असतं (Taking Paracetamol during pregnancy). गर्भवती महिलांनी पॅरासिटामोल या औषधाचं सेवन करू नये. कारण यामुळे गर्भातल्या बाळावर विपरित परिणाम होऊ शकतो, असं एका अभ्यासात वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. गर्भवती महिलांसाठी पॅरासिटामोलचा वापर करावाच लागला तर तो मर्यादित स्वरूपाचा असावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गर्भधारणेच्या काळात पॅरासिटामोलचा वापर या अनुषंगानं करण्यात आलेल्या संशोधनाविषयीचा लेख नेचर रिव्ह्यूज एंडोक्रायनॉलॉजी या नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. या संशोधनात युनिव्हर्सिटी ऑफ कोपनहेगनमधले डॉ. डेव्हिड क्रिस्टिन्सन यांच्यासह 91 वैज्ञानिकांनी मानवावरच्या आणि प्राण्यांवरच्या अभ्यासाद्वारे गर्भवती महिलांवर पॅरासिटामोलच्या पडणाऱ्या प्रभावाविषयी अभ्यास केला. हे वाचा - गरोदर काळात अंगावर खाज सुटण्याची समस्या सतावतेय? हे घरगुती उपाय करून पाहा या संशोधकांच्या मते, महिलांनी गर्भधारणेच्या कालावधीत पॅरासिटामोलचं सेवन केलं तर त्यामुळे भ्रूणाच्या विकासावर परिणाम होतो. जन्मानंतर बाळामध्ये ब्रेन (Brain), रिप्रॉडक्टिव्ह (Reproductive) आणि युरो जेनायटल डिसऑर्डर्सचा (Urogenital Disorders) धोका वाढतो. मेल ऑनलाइनच्या वृत्तानुसार, पेनकिलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरासिटामोलसारखं औषध गर्भातल्या बाळाच्या विकासावर परिणाम करतं. यामुळे जन्मानंतर बाळामध्ये एडीएचडी (ADHD), ऑटिझम, आयक्यूमध्ये (IQ) कमतरता, बोलण्यास वेळ लागणं अशा समस्या दिसून येतात, असं अनेक संशोधनांतून स्पष्ट झालं आहे. पॅरासिटामोलच्या वापरामुळे गर्भवती महिलांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. डॉक्टरांनी गर्भवती महिलेला पॅरासिटामोल घ्यायला सांगितलं, तर त्या महिलेस त्याच्या परिणामांची माहिती देणं आवश्यक आहे, असं वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, गर्भवती महिलेला पॅरासिटामोल घ्यायचीच असेल तर या औषधाच्या डोसचं प्रमाण अत्यंत कमी असावं. कारण अमेरिकेत Acetaminophen नावाच्या औषधाच्या वापरामुळे गर्भातल्या बाळाच्या विकासावर परिणाम झाल्याचं एका संशोधनातून वैज्ञानिकांना दिसून आलं आहे. हे वाचा - Appendix चं ऑपरेशन करायला गेली आणि पोटातून निघालं चक्क बाळ; महिलाही झाली शॉक काही संशोधकांना ही बाब मान्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे संशोधन निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसं नाही. अनेकदा गर्भवती महिलांमध्ये आपल्या न जन्मलेल्या बाळाबद्दल चिंता असते. यामुळेदेखील बाळाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो, असं काही संशोधकांनी म्हटलं आहे. एनएचएसनं (NHS) याबाबत सांगितलं, की पॅरासिटामोल गर्भवती महिलांसाठी सर्वांत सुरक्षित असून, पेनकिलर किंवा वेदनाशामक म्हणून हा पहिला पर्याय मानला जातो. अमेरिकेतल्या सुमारे 65 टक्के महिलांनी गर्भधारणेच्या काळात पॅरासिटामोलची गोळी घेतली असल्याचं सांगितलं; मात्र जे रुग्ण लिव्हर किंवा किडनीच्या आजारानं ग्रस्त आहेत किंवा जे रुग्ण एपिलेप्सीसाठी औषध घेतात त्यांना हे औषध द्यायचं असल्यास त्यांची विशेष काळजी घ्यावी, असं काही हेल्थ प्रोफेशनल्सनी स्पष्ट केलं आहे.
First published: