हे वाचल्यावर तुम्ही कधीही उभं राहून जेवण्याचा विचार करणार नाही

उभं राहून जेवल्याने आपल्या शरीराचं किती नुकसान होतं याबद्दल अनेकजण अनभिज्ञ असतात.

News18 Lokmat | Updated On: Sep 14, 2019 08:21 AM IST

हे वाचल्यावर तुम्ही कधीही उभं राहून जेवण्याचा विचार करणार नाही

मंडळी एक असा काळ होता जेव्हा लोक जमिनीवर बसून जेवायचे. पण काळ बदलला तशी जेवणाची पद्धतही बदलत गेली. आता तर लोक टेबल-खुर्चीवर बसून जेवायला लागले. हे कमी की काय अनेक ठिकाणी लोत उभं राहून जेवतात.

लग्न कार्य असो किंवा एखादी पार्टी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बुफे डिनर किंवा बुफे लंच पाहायला मिळेल. फार कमी ठिकाणी बैठक लावून जेवण दिलं जातं.

उभं राहून जेवल्याने आपल्या शरीराचं किती नुकसान होतं याबद्दल अनेकजण अनभिज्ञ असतात. आज आम्ही तुम्हाला उभं राहून जेवल्याने होणाऱ्या नुकसानाबद्दल सांगणार आहोत.

उभं राहून जेवल्याने अपचन, लठ्ठपणा असे आजार उद्भवतात. असं म्हटलं जातं की उभं राहून खाल्ल्याने आपल्या शरीरातील आतड्या आकसल्या जातात आणि त्यामुळे खाल्लेलं पचायला त्रास होतो.

उभं राहून जेवताना आपल्या पायात बूट किंवा चप्पल असते ज्यामुळे आपले पाय गरम पडतात. आयुर्वेदानुसार जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपले पाय थंड असणं महत्त्वाचं आहे.

Loading...

बुफेमध्ये सारखं सारखं जाऊन जेवण घेण्यापेक्षा एकदाच काय ते जास्त ताटात वाढून घेतात. काही वेळा आपण जास्त खातो आणि त्यामुळे अॅसिडिटी आणि लठ्ठपणासारखे त्रास होतात.

बसून जेवल्याने आपलं मन शांत आणि एकाग्र राहतं. पण उभं राहून जेवल्याने ती एकाग्रता राहत नाही.

उभं राहून जेवताना अनेकदा आपण खूप घाईत जेवतो. त्यामुळे ठसका लागणे किंवा नाकात घास जाण्यासारखे प्रकार होतात.

उभं राहून खाल्याने आपल्या शरीराला योग्य ते पोषक घटकही मिळत नाहीत. त्यामुळे नेहमी प्रयत्न करा की तुम्ही जमिनीवर बसून जेवाल. तेच आरोग्यदायी असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 08:21 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...