मुंबई, 30 डिसेंबर : अंजीर (Fig) हे केवळ टेस्टसाठीच नाही तर आरोग्यासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर आहे. या कारणास्तव, हिवाळ्याच्या हंगामात लोक शरीराची उष्णता राखण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी आहारात अंजीरचा उपयोग करतात. मात्र, काहीजण दिवसातून अनेकदा अंजीर खातात. अंजीराचे अतिसेवन आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.
अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याच्या विविध समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी अंजीराचे अतिसेवन टाळावे. अंजीर जास्त प्रमाणात खाणे तुमच्यासाठी कसे हानिकारक ठरू शकते, त्याबद्दल जाणून (Side Effects of Fig) घेऊया.
रक्तस्त्राव वाढू शकतो
अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने रक्तस्रावाची समस्या वाढू शकते. वास्तविक, अंजीर उष्ण असल्याने ते रेटिनल रक्तस्रावाचे कारण बनू शकते. यामुळे महिलांना मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते.
पोट फुगणे
अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या देखील होऊ शकते. अंजीरमध्ये भरपूर कॅलरीज असल्याने पोट लवकर भरते. त्यामुळे अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगण्याचा त्रास देखील होऊ शकतो.
हे वाचा - कडुलिंबाचा काढा वजन कमी करण्यासाठी आहे प्रभावी; जाणून कसा बनवायचा आणि कधी प्यायचा
आतड्यांमध्ये बिघाड
अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने यकृत आणि आतड्यांचे नुकसान होऊ शकते. अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने आतड्यांमध्ये सूज येऊ शकते. यासोबतच अंजीराच्या बिया मोठ्या प्रमाणात शरीरात गेल्याने तुमचे पोट बिघडू शकते.
हे वाचा - फक्त सुगंधाला भुलू नका; Deodorant खरेदी करताना या गोष्टींची खात्री करा अन् मगच पैसे द्या
शरीरात कॅल्शियमची कमतरता
अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता देखील होऊ शकते. वास्तविक अंजीरमध्ये भरपूर ऑक्सलेट आढळतात. यामुळे शरीरातील कॅल्शियम शोषले जाते. यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियम कमी होऊ शकते.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle