मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /हिवाळा म्हणून साखरेऐवजी गुळाचा चहा पिताय; करू नका ही एक चूक होईल उलट परिणाम

हिवाळा म्हणून साखरेऐवजी गुळाचा चहा पिताय; करू नका ही एक चूक होईल उलट परिणाम

गुळाचा चहा : गुळात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. ते मुलांची स्मरणशक्ती तसेच त्यांची प्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच गुळामुळे मेंदूला ऊर्जा मिळते आणि फ्रेश वाटू लागतं, त्यामुळे परीक्षेच्या दिवसात मुलांना फक्त गुळाचा चहा द्यावा.

गुळाचा चहा : गुळात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. ते मुलांची स्मरणशक्ती तसेच त्यांची प्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच गुळामुळे मेंदूला ऊर्जा मिळते आणि फ्रेश वाटू लागतं, त्यामुळे परीक्षेच्या दिवसात मुलांना फक्त गुळाचा चहा द्यावा.

गूळ चवीला गोड आणि उष्ण असतो. त्यामुळे हिवाळ्यात गुळाचा चहा आवर्जून प्यायला जातो.

    मुंबई, 28 नोव्हेंबर : गूळ (Jaggery)  आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे (Health benefits of jaggery). गुळाचं सेवन केल्याने लोह आणि इतर पोषक तत्त्वं शरीराला (Jaggery Health Benefits) मिळतात. गुळात एक नैसर्गिक गोडवा असतो. हिवाळ्यात गुळाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. गुळामुळे शरीरात उष्णता येते. त्यामुळे अनेक जण चहामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करतात. गुळापासून तयार केलेला चहा हा आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं; पण गुळापासून बनलेला चहा अति प्रमाणात प्यायल्याने आरोग्याला हानी पोहोचते.

    गूळ चवीला गोड आणि उष्ण असतो. गुळाचा चहा खूप आरोग्यदायी असल्याचं म्हटलं जातं. यामुळे कधी-कधी प्रमाणापेक्षा जास्त गुळाचा चहा प्यायला जाऊ शकतो. दिवसभरात गुळाचा चहा 4 कपांपेक्षा जास्त प्यायल्याने बऱ्याच समस्या उद्भवू शकतात. गुळाच्या चहाचं अतिसेवन केल्याने नेमके काय दुष्परिणाम होऊ शकतात याबाबत माहिती दिली आहे 'ओन्ली माय हेल्थ डॉट कॉम'ने.

    गुळाच्या चहाचं सेवन जास्त प्रमाणात झाल्यास वजन वाढू शकतं, नाकातून रक्त येऊ शकतं. तसंच, इतर अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. गुळाच्या चहाचा अतिरेक झाला, तर काय नुकसान होऊ शकतं, याविषयी जाणून घेऊ या. 'ओन्ली माय हेल्थ डॉट कॉम'ने याबद्दलची माहिती प्रसिद्ध केली आहे.

    हे वाचा - मधुमेहासारख्या आजारापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी सांगितलं सिक्रेट

    अपचन - दिवसभरात गुळाचा चहा 4 कपांपेक्षा जास्त प्यायल्याने अपचनाच्या तक्रारी उद्भवतात. तसंच नव्या गुळाचा वापर चहा तयार करण्यासाठी केल्यास पोटाशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता वाढते.

     मुरुमं - गुळाचा चहा जास्त प्रमाणात घेतल्याने पोटातली उष्णता वाढू शकते. विशेषत: उन्हाळ्यात गुळाचं जास्त सेवन केल्याने त्वचाही खराब होऊ शकते. पोटात उष्णता (heat) निर्माण झाल्यास चेहऱ्यावर मुरुमं येतात. गुळाचा अति वापर केल्यामुळे इतर शारीरिक समस्याही निर्माण होऊ शकतात.

    वजन वाढणं - गुळात कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. गुळाचा चहा जास्त घेतल्यास तुमचं वजन (Weight) वाढू शकतं. गुळाचा चहा नियमित घेऊ शकता; पण दिवसभरात 2 ते 3 कपांपेक्षा जास्त प्रमाणात गुळाचा चहा घेऊ नका.

    नाकातून रक्त - गूळ उष्ण गुणधर्माचा असतो.  गुळाच्या अतिसेवनामुळे तुमच्या नाकातून रक्त येऊ शकतं. त्यामुळे गुळाचा चहा जास्त प्रमाणात घेऊ नये.

    ब्लड ग्लुकोज वाढतं -  मधुमेह (Diabetes) असणाऱ्या व्यक्तींनी गुळाचं सेवन प्रमाणात करावं. गुळाचा चहा अति प्रमाणात घेतल्यास रक्तातल्या साखरेची पातळी वाढू शकते. 10 ग्रॅम गुळात सुमारे 9.7 ग्रॅम साखर असते. त्यामुळे चहा जास्त घेतल्यास शरीरातल्या साखरेचं प्रमाण वाढतं. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी चहा घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ते तुम्हाला योग्य माहिती देतील.

    हे वाचा - आला थंडीचा ऋतू; आहारात समावेश करा बाजारीचा, होईल बराच फायदा

    स्वच्छ आणि चांगल्या गुळाचा वापर चहा करण्यासाठी करावा. अस्वच्छ गुळाचा वापर तुमच्या शरीराराला हानी पोहोचवू शकतो. खराब झालेल्या गुळाचं सेवन केल्यास पोटात जंत निर्माण होऊ शकतात. म्हणून गुळाचा चहा बनवण्यापूर्वी गूळ चांगला असल्याची खात्री करून घ्या.

    First published:
    top videos

      Tags: Food, Health, Lifestyle, Tea, Winter