होऊ नये तेच झालं; कोरोना लॉकडाऊनचा लहान मुलांवर दुष्परिणाम; पालकांची चिंता वाढली

होऊ नये तेच झालं; कोरोना लॉकडाऊनचा लहान मुलांवर दुष्परिणाम; पालकांची चिंता वाढली

लहान मुलांवरही कोरोना लॉकडाऊनचा नकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जुलै : कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी लॉकडाऊन (corona lockdown) लागू करण्यात आला. मात्र या लॉकडाऊनचे अनेकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. लहान मुलांमध्ये लॉकडाऊनचे दुष्परिणाम दिसून आलेत. कोरोना लॉकडाऊनमुळे मुलांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. या मुलांच्या वर्तणुकीतही नकारात्मक बदल झाले आहेत.

कोरोना लॉकडाऊनमध्ये 65% मुलांना गॅझेट्सचं व्यसन लागलं आहे.  तर तर 65.2% मुलांना शारीरिक समस्या बळावल्यात. जयपूरमधील जेके लोन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, आग्रा, लखनऊ, चंदीगड आणि राजस्थानमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं.

सर्वेक्षणानुसार,

65.2% मुलांना शारीरिक समस्या बळावल्यात. 23.40% मुलांचं वजन वाढलं आहे. 26.90% मुलांना डोकेदुखी बळावली आहे, ती चिडचिडी झालीत. 22.40% मुलांचे डोळे दुखू लागलेत, डोळ्यांना खाज येऊ लागली.

डिव्हाइसशी जास्त संपर्कात येणारी 70.70% मुलांची वर्तणूक बदलली आहे.  23.90%  मुलं दैनंदिन सवयीही सोडल्यात. 20.90% मुलांची वृत्ती निष्काळजी झाली आहे. 36.80% मुलं हट्टी झालेत, 17.40% मुलांचं कशातच लक्ष लागत नाही.

हे वाचा - राज्याला कोरोनाचे धक्के सुरूच, आजही 5368 रुग्णांची वाढ तर 204 जणांचा मृत्यू

50% मुलांना झोप लागत नाही. बेडवर गेल्यानंतर 20 ते 60 मिनिटं ही मुलं झोपत नाहीत. तर 17% मुलं झोपेत मध्येच उठतात आणि त्यानंतर पुन्हा 20 ते 30 मिनिटांनीच ते झोपतात.

या मुलांना दिवसा झोप लागते, थकवा, डोकेदुखी, चिडचिड, वजन वाढ, पाठदुखी बळावली आहे. त्यांची शौचाची सवयदेखील बदलली आहे.

दोन तृतीयांश मुलांच्या वागणुकीत बदल झाल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी केली आहे. 6-7% मुलांना रात्रीच्या वेळी भीती वाटते. मुलांचा हट्टीपणा 32 टक्क्यांनी वाढणार आहे. मुलांमधील रागही 30 टक्क्यांनी वाढला आहे.

हे वाचा - लेकराला नाही घेऊ शकले लॅपटॉप, हताश बळीराजानं उचललं टोकाचं पाऊल

बहुतेक शाळांनी दिवसाला 1 ते 8 तास ऑनलाइन क्लासेस सुरू केलेत.  लॉकडाऊनमध्ये मुलांचा स्क्रिन टाइम दोन ते तीन पटीने वाढला आहे. जिथं मुलं दिवसाला दोन तास डिव्हाइस वापरायचे तिथं ते आता पाच तास वापरू लागलेत. ज्यामुळे त्यांचं शारीरिक कार्य कमी झालं आहे. मुलं मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅबलेटचा वापर करू लागले. यामध्ये मोबाइलचा वापर सर्वात जास्त केला आहे. अर्धा तासही ही मलं डिव्हाइस सोडायला तयार नाहीत. रागाराग करणं, रडणं, पालकांचं न ऐकणं अशी वागणूक या मुलांची झाली आहे.

कोरोना लॉकडाऊनने कोरोनाला तर दूर ठेवलं आहे. मात्र आता मुलांच्या आरोग्यावर झालेल्या या परिणामांमुळे पालकांची चिंता वाढली आहे.

संपादन - प्रिया लाड

Published by: Priya Lad
First published: July 6, 2020, 8:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading