मुंबई, 27 डिसेंबर : कुणाला किती मुलं असावीत आणि त्यांचा सांभाळ त्यांनी कसा करावा हा ज्या-त्या जोडप्याचा प्रश्न आहे. भारताची लोकसंख्या वाढू लागल्यानंतर गेल्या सुमारे 30-35 वर्षांपासून लोकसंख्या नियंत्रणाबाबत सरकारने प्रचंड जनजागृती केली. त्यामुळे कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या (Condoms & Contraceptives) यांची प्रसिद्धी झाली आणि ही साधनं लोक वापरू लागले. याबरोबर अनेक गर्भ निरोधाची अन्य साधनंही पुरुष आणि स्रिया वापरतात. यात स्रियांसाठी सर्वांत सोपी पद्धत म्हणजे गर्भनिरोधक गोळी घेणं (Side effect of Contraceptives pills). पण ही गोळी अधिक प्रमाणात घेतली तर जेव्हा जोडप्याला अपत्यप्राप्तीची अपेक्षा असते तेव्हा मात्र प्रजननासंबंधी प्रश्न उद्भवतात (Contraceptives pills cause infertility).
तरुण महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचं प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच भारतात टोटल फर्टिलिटी रेट (Total Fertility Rate) म्हणजे टीएफआर रिप्लेसमेंटच्या खालच्या पातळीला गेला आहे. याचं एक कारण म्हणजे मूल होऊ नये यासाठी महिला गर्भनिरोधक गोळ्या घेत आहेत त्याचा परिणाम त्यांच्या प्रजनन क्षमतेवर होत आहे.
झी न्यूज हिंदीने टाइम्स ऑफ इंडियाचा वृत्ताचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणातील (NHHS 5) निष्कर्षांनुसार 2015-16 या वर्षात कुटुंब नियोजनासाठी गर्भ निरोधक वापरणाऱ्यांच्या संख्येत 8.7 टक्के वाढ झाली आहे. ही जरी लोकसंख्या नियमनाच्या दृष्टिनी चांगली बातमी असली तरीही जन्म नियंत्रण आणि वंध्यत्व यांच्याशी संबंधित नवा वाद निर्माण झाला आहे.
हे वाचा - OMG! 9 महिने नव्हे तर 35 वर्षे 'प्रेग्नंट' होती महिला; रिपोर्ट पाहून डॉक्टर शॉक
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व याला पुरुष किंवा स्रिच्या प्रजनन प्रणालीचा एक आजार म्हटलं आहे. 12 महिने किंवा त्याहून अधिक काळ संभोग करूनही जेव्हा स्री गरोदर राहत नाही तेव्हा त्याला वंध्यत्व म्हणतात. सध्या जगभरातील अनेक जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे याची अनेक कारणं आहेत त्यापैकी काही ट्यूबल डिसऑर्डर, (ब्लॉक्ड फॅलोपियन ट्युब), यूटेरस डिसऑर्डर (एंडोमेट्रियोसिस), जन्मजात विकार (सेप्टेट यूटेरस), ओव्हरी डिसिज (पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम),आणि हॉर्मोनचं असंतुलन ही काही कारणं असू शकतात. त्याचबरोबर जेनेटिक कारणंही असू शकतात. भारतात कुटुंब नियोजनासाठी सर्वांत मोठ्या प्रमाणावर काँडोम, टॅब्लेट, व्हजायनल रिंग्ज, गर्भनिरोधक इंजेक्शन आणि इंट्रॉटरीन डिव्हाइस वापरली जातात. पण मूल व्हावं असं वाटतं तेव्हा तुम्हाला या सगळ्या उपकरणांचा वापर थांबवायला पाहिजे.
हे वाचा - सेक्स लाईफसाठी आहारात या गोष्टींचा समावेश हवाच; जाणून घ्या त्याचे सर्व फायदे
या संशोधनात असंही लक्षात आलं की ज्या महिलांनी गर्भधारणेसाठी गर्भनिरोधक गोळ्या घेणं बंद केलं त्यापैकी 83 टक्के स्रियांना एका वर्षाच्या आत गर्भधारणा झाली. जर महिलांनी दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या तर त्यांना गर्भधारणेवेळी प्रचंड त्रास होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने या गोळ्या घ्याव्यात आणि गर्भधारणा व्हावी असं वाटत असेल तेव्हाही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गोळ्या बंद करण्याचा निर्णय घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.