Home /News /lifestyle /

Utensils In Kitchen : स्वयंपाकघरात वापरू नका 'ही' भांडी; आरोग्याला ठरतात घातक

Utensils In Kitchen : स्वयंपाकघरात वापरू नका 'ही' भांडी; आरोग्याला ठरतात घातक

शिष्ट पद्धतीची भांडी स्वयंपाकघरात (Cooking) वापरणं तुमच्या आरोग्याला धोकायदायक असतात? या धातूचा परिणाम कधी इतका घातक असतो की तुमच्या जिवावर बेतू शकतं.

    दिल्ली, 17 सप्टेंबर : किचनमध्ये (Kitchen Utensils safty) सर्वात धोकादायक ठरणारी गोष्ट कुठली असेल तर ती फार फार तर गॅस (Gas cylinder) सिलिंडर असते. कधी कधी स्वयंपाक करत असताना एखादं भांडं फार गरम झालं तर त्याचे चटकेही बसू शकतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की एखादी विशिष्ट पद्धतीची भांडी स्वयंपाकघरात (Cooking) वापरणं तुमच्या आरोग्याला धोकायदायक असतात? या धातूचा परिणाम कधी इतका घातक असतो की तुमच्या जिवावर बेतू शकतं. अनेकदा भारतातील स्वयपाकघरात अॅल्युमीनियमची भांडी वापरली जातात. त्या वेळी अशा प्रकारच्या भांडी वापरताना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. अॅल्युमिनियमची भांडी तातडीने गरम होतात, त्यामुळे याचा स्वयंपाकघरात मोठा वापर केला जातो. परंतु आता एका संशोधनात हा धातू आणि पर्यायाने ही भांडी आरोग्याला घातक ठरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता स्वयंपाकघरात तुम्ही अॅल्युमीनियमची भांडी वापरत असाल तर त्याविषयी काही काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. Peanut Benefits : भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्याने 'या' घातक आजाराचा धोका होईल कमी संशोधनात काय समोर आलं आहे? जर अॅल्युमीनियमच्या भांड्यात स्वयंपाक केला जात असेल तर जलदगतीने अन्नपदार्थाबरोबर काही हानीकारक तत्वंही आपल्या भोजनात त्या अॅल्युमीनियमच्या भांड्यामुळे येतात, त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते. Almond Tea : दररोज घ्या बदाम चहा; सेवनामुळे टळतील 'हे' घातक आजार! कशी काळजी घ्याल? स्वयंपाकघरात तुम्ही जर अॅल्युमीनियमच्या भांड्याचा वापर करत असाल तर एका गोष्टीची नेहमी काळजी घ्यायला हवी. ती म्हणजे जेव्हा तुम्ही या भांड्याचा उपयोग करून स्वयंपाक करता तर ते झाल्यानंतर अन्नपदार्थ फार वेळ अॅल्युमीनियमच्या भांड्यात ठेऊ नका. स्वयंपाक झाल्यानंतर अन्नपदार्थ लवकर खाऊन घ्यावे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Food, Health, Health Tips

    पुढील बातम्या