मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Excessive Sweating : जास्त घाम येणे हे मधुमेहाचे लक्षण तर नाही? हे असू शकते कारण

Excessive Sweating : जास्त घाम येणे हे मधुमेहाचे लक्षण तर नाही? हे असू शकते कारण

काही रुग्णांना मधुमेहामध्ये खूप घाम येतो. याची अनेक कारणे असू शकतात. पण जर मधुमेहामुळे घाम येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

काही रुग्णांना मधुमेहामध्ये खूप घाम येतो. याची अनेक कारणे असू शकतात. पण जर मधुमेहामुळे घाम येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

काही रुग्णांना मधुमेहामध्ये खूप घाम येतो. याची अनेक कारणे असू शकतात. पण जर मधुमेहामुळे घाम येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 फेब्रुवारी : मधुमेह ही संपूर्ण जगाची समस्या बनली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, जगात 422 दशलक्षाहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. यासोबतच दरवर्षी 15 लाख लोकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मधुमेहामुळे मृत्यू होतो. जगातील एकूण मधुमेहाच्या रुग्णांपैकी 17 टक्के रुग्ण भारतात आहेत ही मोठी चिंतेची बाब आहे.

याचा अर्थ असा की, भारतात 8 कोटी लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. आकडेवारीनुसार, 2045 पर्यंत भारतात 13.5 कोटी लोक मधुमेही असतील. यामुळेच भारताला डायबेटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणून ओळखले जाऊ लागले. घाम येणे हा मधुमेहाच्या लक्षणांमध्ये समाविष्ट नाही, परंतु मधुमेह झाल्यानंतर घामाची समस्या अनेक रुग्णांमध्ये दिसून येते.

कॅन्सर झाल्यास पुरुषांमध्ये दिसतात ही लक्षणं, या छोट्या त्रासांकडेही करू नका दुर्लक्ष

मधुमेहामध्ये शरीराचे नैसर्गिक तापमान राखण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे व्यक्तीला वारंवार चक्कर येते आणि रात्रीच्या वेळी घामही येतो. ही चिंतेची बाब असली तरी. याचा अर्थ असा आहे की, मधुमेहावर नियंत्रण नीट झाले नाही.

का येतो जास्त घाम?

व्हेरीवेलहेल्थ वेबसाइटनुसार, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर संतुलित नसताना जास्त घाम येतो. जरी प्रत्येक व्यक्तीला घाम येतो. खूप कमी लोक असतील ज्यांना घाम येत नाही. डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये काही लोकांना पाय किंवा मांड्यांमध्ये घाम येतो. एका संशोधनानुसार, मधुमेहाने ग्रस्त सुमारे 84 टक्के लोकांना जास्त घाम येतो. विशेषतः मानेच्या खाली. याचे मुख्य कारण म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होणे.

वास्तविक मधुमेहाचे रुग्ण रक्तातील साखर कमी करण्यासाठी औषध घेतात. औषध घेतल्याने साखरेचे शोषण खूप जलद होते. दुसरीकडे मधुमेहामुळे ते मिठाई खाणे पूर्णपणे बंद करतात. यामुळेच शरीरात झपाट्याने साखर किंवा ग्लुकोजची कमतरता निर्माण होते. जेव्हा ग्लुकोजची कमतरता असते तेव्हा शरीराला जास्त घाम येतो. मात्र जेवल्यानंतर साखरेची पातळी थोडीशी वाढली की, परिस्थिती योग्य होते. याशिवाय घाम येण्याची अनेक कारणे असतात.

निळे पडलेले ओठ असू शकतात अस्थमा अटॅकचे लक्षण, अशाप्रकारे टाळता येईल त्रास

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Diabetes, Health, Health Tips, Lifestyle